प्रशासनाला दुर्घटनेची प्रतीक्षा? ; शिरोली ते पाईट रस्ता खड्ड्यांत : खोदलेल्या जागा जीवघेण्या

आंबेठाण : खेडच्या पश्चिमेकडील शिरोली-वांद्रा भागात जाणारा वर्दळीचा रस्ता म्हणजे शिरोली वांद्रा रस्ता मागील आठवड्यात पाळू येथे रस्ता खचल्याने वाहतूक बंद पडली होती. असे असतानाही किवळे येथे मोरीचे सिमेंट पाइप फुटल्याने रस्त्यामध्येच खड्डा तयार झाला आहे. यामुळे रात्रीच्या वेळी अनेक दुचाकीस्वार पडले. असे असताना प्रशासन काही तर दुर्घटना घडण्याची वाट पाहत आहे का, असा सवाल उपस्थित केला जात आहे.
शिरोली ते पाईट रस्त्यावर खड्डेच खड्डे असून किवळे, चांदूस व पाईट येथे लहान वाहने खाली टेकतात तर शाळकरी मुलांना जीव मुठीत धरून जा-ये करावा लागत आहे. त्यातच केबल वाहिनींनी उन्हाळा सोडून भर पावसात खोदकाम करून मध्येमध्ये खड्डे तसेच ठेवले आहे.
जलजीवन लाइन, व शेतकऱ्यांच्या पाइपलाइन यांनी खोदलेल्या जागा तर जीवघेण्या झाल्या आहेत. दररोजचे जाणारे येणारे कर्मचारी एसटी वाहनचालक अक्षरशः मान कंबरदुखी पाठदुखी ने आजारी पडल्याने संतापाच्या भावना व्यक्त करत आहेत. तरी तात्काळ खड्डे बुजवण्याचे काम प्रशासनाने करावे अन्यथा आंदोलनाचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.
या कामाची गंभीर या गोष्टीची गंभीर दखल घेऊन या रस्त्याच्या कामाचे नुकताच भूमिपूजन आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या हस्ते झाले आहे व या गोष्टींची दखल घेऊन मी ठेकेदाराला लवकरात लवकर काम सुरू करण्यास सांगितले आहे जेणेकरून नागरिकांची गावकऱ्यांची यांना कमी त्रास होईल.
– स्वाती कदम, सरपंच, किवळे





