बसपाच्या ‘हत्ती’वर निराशा? आकाश आनंद यांच्याबाबत घेतलेल्या मायावतींच्या निर्णयाने सर्वच चकित

BSP Mayawati | बहुजन समाज पार्टीच्या प्रमुख मायावती यांनी अलीकडेच घेतलेल्या निर्णयांमुळे सर्वांनाच चकित केले आहे. मायावतींचा भाचा आकाश आनंद याची पक्षाच्या राष्ट्रीय समन्वयक पदावरून हकालपट्टी केली तसेच त्यांना पक्षातूनही बाहेरचा रस्ता दाखवला आहे.
आकाशच्या जागी त्यांनी त्यांचे धाकटे बंधू आनंद कुमार आणि राज्यसभा खासदार रामजी गौतम यांची नियुक्ती केली आहे. इतकेच काय तर, मायावती यांनी जीवंतअसेपर्यंत आता कोणीही उत्तराधिकारी नसणार असल्याचेही स्पष्ट केले. याचा अर्थ असा आहे की मायावतच बीएसपीचे अध्यक्ष राहील.
मायवतींच्या या निर्णयानंतर त्यांचा आकाशवर विश्वास नसल्याचे यातून स्पष्ट होत आहे. 12 फेब्रुवारीला मायावती यांनी आकाश यांचे सासरे अशोक सिद्धार्थ यांनी बसपाची दोन गटांमध्ये विभागणी केली असा आरोप केला. आकाशची कारकीर्दही त्यांनीच उद्ध्वस्त केली असंही त्या म्हणाल्या. मायावती यांनी गेल्या महिन्यात गटबाजी आणि पक्षविरोधी कारवायांसाठी सिद्धार्थ यांची पक्षातून हकालपट्टी केली होती.
मायावतींनी कोणाला ठरवले जबाबदार?
“अशोक सिद्धार्थ यांच्या मुलीचे आकाशशी लग्न झाले आहे. सिद्धार्थ यांनी त्यांच्या मुलीवर आणि आकाशवर किती प्रभाव टाकला आहे हे मला पाहावं लागेल. अशा परिस्थितीत आकाशला आम्ही सर्वपक्षीय जबाबदारीतून दूर केले आहे. आकाशची हकालपट्टी करण्याला तसंच त्याचं करिअर उद्ध्वस्त करत पक्षाचं नुकसान करण्यालाही अशोक सिद्धार्थच जबाबदार आहे,” असेही यावेळी मायावती यांनी सांगितलं आहे.
आकाश आनंद यांना दुसऱ्यांदा धक्का
आकाशला 2019 मध्ये पहिल्यांदाच बसपाचे राष्ट्रीय समन्वयक म्हणून नेमण्यात आले. मायावतींनी डिसेंबर 2023 मध्ये आकाशला उत्तराधिकारी घोषित केले होते, परंतु गेल्या वर्षी लोकसभा निवडणुकीत आपला निर्णय मागे घेतला. त्यानंतर त्याला मागील वर्षी पार पडलेल्या लोकसभा निवडणुकांदरम्यान पदावरून हटवले गेले होते. निवडणुकांच्या आधी सीतापूर इथे शत्रुत्वाला प्रोत्साहन देणारे भाष्य केल्याने त्याला हटवले गेले होते. काही आठवड्यानंतरच त्याची पुन्हा नियुक्ती करण्यात आली. त्यामुळे त्यांना हा धक्का बसण्याची दुसरी वेळ आहे.
2007 मध्ये उत्तरप्रदेश राज्यात सत्ता
2007 च्या विधानसभा निवडणुकीत बसपाची उत्तरप्रदेश राज्यात सत्ता आली आणि मायावती या मुख्यमंत्री झाल्या होत्या. मात्र, त्यानंतर झालेल्या प्रत्येक निवडणुकीत बसपाची अधोगतीच पहायला मिळाली. त्यांचा हा करिष्मा पुढे चालला नाही. मतांची टक्केवारी कमी झाली. निवडून येणाऱ्या जागांचेही प्रमाण घटले. 2022 च्या निवडणुकीत बसपाला 403 पैकी केवळ एकच जागा जिंकता आली. तसेच 2024 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीतही त्यांना चांगली कामगिरी करता आली नाही.
दिल्ली, हरयाणा, महराष्ट्र निवडणुकीत अपयश
आकाश यांना मायावतींनी पक्षाला उभारी देण्यासाठी म्हणून नियुक्त केले होते. मात्र दिल्ली, हरयाणा आणि २०२३च्या राजस्थानच्या निवडणुकीत पक्षाला फारसा बदल दिसला नाही. हरयाणात बसपाने ३५ जागा लढवल्या होत्या, मात्र त्यापैकी एकही जागा त्यांना जिंकता आली नाही. राजस्थानमध्ये १८४ जागांपैकी केवळ दोन जागांवर पक्षाला विजय मिळवता आला. २०१८नंतर अनेक आमदारांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
शिवसेना आणि राष्ट्रवादीसारखी स्थिती होण्याची भीती?
याशिवाय मायावती यांना पक्षाचे दोन गटात विभागणी होईल अशी भीती वाटत असल्याची देखील चर्चा होत आहे. आकाश हे सासरे आणि पत्नीच्या मदतीने पक्षात फुट पाडू शकतात बीएसपीमध्ये देखील महाराष्ट्रातील शिवसेना आणि राष्ट्रवादी कॉँग्रेसची जी स्थिती झाली ती होण्याची भीती असल्याचेही म्हंटले जात आहे.
2016 मध्ये आकाश यांचा सक्रिय राजकारणात प्रवेश
लंडनहुन भारतात आल्यानंतर आकाश आनंदने आपले वडील आनंद कुमार यांच्या बिजनेसमध्ये मदत करण्यात सुरवात केली. 2016 मध्ये आकाश यांनी सक्रिय राजकारणात प्रवेश केला आणि त्यांनी बसपच्या अनेक पदांवर काम केले. बर्याच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीतही त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.
2017 मध्ये यूपी विधानसभा निवडणुका हारल्यानंतर मायावतीने 2019 च्या लोकसभा निवडणुकीत पक्षाच्या स्टार प्रचारकांच्या यादीमध्ये आकाश आनंदचा समावेश केला. जेव्हा एसपी-बीएसपी युती तुटली झाली तेव्हा मायावती यांनी आकाश आनंदला पक्षाचे राष्ट्रीय समन्वयक म्हणून घोषित केले. यानंतर, आकाश आनंद पक्षात खूप सक्रिय होते, परंतु अलीकडेच मायावती यांनी त्याला अचानक सर्व पदांवरून काढून टाकले आणि आता त्याला पक्षातून काढून टाकले.
राष्ट्रीय स्तरावरील दर्जाबाबत धोका ?
सतत खराब कामगिरीमुळे उत्तर प्रदेशच्या 2027 मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीचा रस्ता बसपासाठी अधिक कठीण झाला आहे. पहिल्यांदा हरियाणा, जम्मू आणि काश्मीर, त्यानंतर महाराष्ट्र-झारखंड आणि दिल्लीतील अपयशानंतर बीएसपीला राष्ट्रीय स्तरावरील दर्जाबाबत हा एक मोठा धोका मानला जात आहे.
हेही वाचा:





