थेट पोस्ट लिहिली अन्…; भारताच्या या मोठ्या खेळाडूने केली निवृत्तीची घोषणा! कारण काय?

R Ashwin : सध्या रोहित शर्मा आणि विराट कोहलीच्या निवृत्तीची जोरदार चर्चा सुरू आहे. अशातच आता आणखी एका भारतीय खेळाडूने थेट निवृत्तीची घोषणा केल्याने अनेकांना मोठा धक्का बसला आहे. भारतीय टीममधील स्पिनर अशी ओळख असलेल्या एका खेळाडूने आपल्या निवृत्तीची मोठी घोषणा थेट एक पोस्ट लिहून केली आहे. यामुळे त्या खेळाडूने घेतलेल्या निर्णयामुळे अनेकांकडून आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.
गेल्या काही दिवसांपासून क्रिकेट विश्वात रोहित शर्मा आणि विराट कोहली हे दोघेही वनडेमधून कधी निवृत्ती जाहीर करणार? असा प्रश्न क्रिकेट रसिकांना पडलेला आहे. या दोन्ही खेळाडूंनी याअगोदर T20 आणि टेस्टमधून निवृत्ती जाहीर केली आहे. अशातच आता भारताच्या एका मोठ्या खेळाडूने आयपीएलमधून निवृत्ती जाहीर केली आहे.
निवृत्ती जाहीर केलेल्या खेळाडूचं नाव आर अश्विन म्हणजेच रविचंद्रन अश्विन आहे. याची माहिती त्याने सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली आहे. त्याच्या अधिकृत एक्स हँडलवरून त्याने आयपीएलमधून रिटायरमेंट घेत असल्याचं म्हटलं आहे.
Special day and hence a special beginning.
They say every ending will have a new start, my time as an IPL cricketer comes to a close today, but my time as an explorer of the game around various leagues begins today🤓.
Would like to thank all the franchisees for all the…
— Ashwin 🇮🇳 (@ashwinravi99) August 27, 2025
का घेतली रिटायरमेंट?
आर अश्विनने रिटारयमेंट घेण्यामागचं कारणंही सांगितलं आहे. त्याने या अनुषगांने एक पोस्ट लिहिली आहे. “हा आयुष्यातील खास दिवस आहे. असं म्हणतात की, प्रत्येक गोष्टीचा शेवट आयुष्यात एक नवीन सुरुवात असते. माझ्या गोष्टीमध्ये सुद्धा असचं काहीतरी आहे” असं पोस्टमध्ये त्याने म्हटलं आहे.
चाहत्यांना प्रश्न
अश्विनने निवृत्ती जाहीर करताना त्याने आय़पीएल, BCCI आणि ज्या फ्रेंचायजींकडून खेळला, त्या सर्वांचे आभार मानले आहे. अश्विन आयपीएलमध्ये एकूण पाच टीम्सकडून खेळला. मात्र, आर अश्विन अर्थात रविचंद्रन अश्विन याने अचानक आयपीएलमधून निवृत्ती का जाहीर केली? असा प्रश्न त्याच्या चाहत्यांना पडला आहे.
हेही वाचा : राष्ट्रपती अन् पंतप्रधानांनी दिल्या देशवासियांना गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा ; जाणून घ्या कोण काय म्हणाले ?





