नगर | थेट पंचायत समितीत भरवली शाळा

श्रीगोंदा, (प्रतिनिधी)- शहरातील सिद्धार्थनगर व तालुक्यातील वडघुल येथील प्रत्येकी एक शिक्षकाची समायोजनात बदली झाल्याने पालकांनी मंगळवारी थेट श्रीगोंदा पंचायत समिती कार्यालयातच शाळा भरविली. समायोजनात बदली झालेले शिक्षक हे नवीन येईपर्यंत जागेवर ठेवा, अशा सूचना जिल्हा शिक्षणाधिकारी भास्कर पाटील यांनी दिल्याने आंदोलन मागे घेण्यात आले.
श्रीगोंदा तालुक्यात जिल्हा परिषदेच्या 364 प्राथमिक शाळा असून, मुख्याध्यापक ९, पदवीधर 20 तर उपशिक्षकांच्या 30 जागा रिक्त आहेत. केंद्रप्रमुखांच्या 16 जागा रिकाम्या आहेत, त्यामुळे शिक्षकांचा प्रश्न ऐरणीवर आला. अशा परिस्थितीत सर्व शाळांना विद्यार्थी संख्येच्या प्रमाणात न्याय देण्यासाठी गटशिक्षणाधिकारी अनिल शिंदे व त्यांची टीम प्रयत्न करीत आहेत. मात्र, पालकांचा उद्रेक होत आहे.
सिध्दार्थनगर शाळेत 1 ते 7 वर्गात पाच शिक्षक होते पण अवघे चार शिक्षक राहिले. त्यामध्ये एका शिक्षकाची समायोजनात हंगेश्वर क्लास हंगेवाडी येथे बदली झाली, तीच परिस्थिती वडघुलची आहे. परीक्षा जवळ आल्या आहेत. अशा परिस्थितीत शिक्षकांच्या बदल्या केल्या जात आहेत. या चुकीच्या धोरणामुळे शिक्षण विभागास रोष पत्करावा लागत आहे. ही वस्तुस्थिती आहे
पदवीधर मुख्याधापक व उपशिक्षकांची 59 पदे रिक्त आहेत. अशा परिस्थितीत जिल्हा प्राथमिक शिक्षणाधिकारी भास्कर पाटील यांचे मार्गदर्शनाखाली सर्व शाळांना विद्यार्थी संख्येच्या प्रमाणात न्याय कसा देता येईल, याकडे लक्ष दिले जात आह. पालकांनी सहकार्य करावे. अनिल शिंदे, गटशिक्षणाधिकारी





