Direct tax collection: चालू आर्थिक वर्षात 17 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त प्रत्यक्ष कर संकलन
Updated On:

नवी दिल्ली – देशाच्या प्रत्यक्ष कर संकलनात गेल्या आर्थिक वर्षाच्या तुलनेत 14.69 टक्क्यांची वाढ झाल्याची माहिती केंद्रिय प्रत्यक्ष कर मंडळानं दिली आहे. चालू आर्थिक वर्षात (2024-25) 17 लाख 78 हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त प्रत्यक्ष कर संकलित (Direct tax collection) झाला आहे.
वैयक्तिक प्राप्तीकर संकलनातही 9 लाख 47 हजार कोटी रुपयांची वाढ झाली असून 7 लाख 78 हजार कोटी रुपये भांडवली कर जमा झाला आहे.




