Koregaon Bhima News : डिंग्रजवाडीत पारंपरिक पद्धतीने नागपंचमी साजरी; सुवासिनींकडून वारुळाची पूजा अन् नागदेवतेला दुधाचा अभिषेक
Koregaon Bhima News :

Koregaon Bhima News : शिरूर तालुक्यातील डिंग्रजवाडी येथे नागपंचमीचा सण पारंपरिक व भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला. यावेळी गावातील सुवासिनी व महिलांनी एकत्र येत वारुळाचे विधिवत पूजन केले. नागदेवतेला लाह्या व दूध वाहून धार्मिक परंपरेनुसार पूजा-अर्चा करण्यात आली. (Koregaon Bhima News)
नागपंचमीच्या निमित्ताने महिलांनी सकाळपासूनच वारुळाजवळ गर्दी केली होती. वारुळाला हळद-कुंकू, फुले अर्पण करून पूजन करण्यात आले. त्यानंतर लाह्या व दूध वाहून नागदेवतेचे स्मरण करण्यात आले. यावेळी महिलांनी पारंपरिक पद्धतीने नागपंचमीची पूजा करत कुटुंबाच्या सुख-समृद्धीसाठी तसेच शेतकरी व शेतीच्या भरभराटीसाठी प्रार्थना केली. (Koregaon Bhima News)
गावातील महिलांनी एकत्र येत सण साजरा केल्याने परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते. ग्रामीण भागातील पारंपरिक सण-उत्सवांच्या माध्यमातून जुन्या रूढी-परंपरा जपण्याचे काम आजही सुरू असल्याचे यावेळी दिसून आले. (Koregaon Bhima News)
या पूजनासाठी डिंग्रजवाडीच्या उपसरपंच संगीता गव्हाणे, लक्षदीप चॅरिटेबल ट्रस्टच्या सचिव दिपाली गव्हाणे, तसेच सुवर्णा गव्हाणे, पूजा गव्हाणे, निकिता गव्हाणे, अक्षदा गव्हाणे, संस्कृती गव्हाणे यांच्यासह गावातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. (Koregaon Bhima News)
नागपंचमीच्या झोक्याची परंपरा हरवली!
एकेकाळी नागपंचमी म्हटले की गावागावांत झाडांच्या फांद्यांना बांधलेले मोठमोठे झोके, झोके खेळणाऱ्या महिला-मुली आणि पारंपरिक गाणी असा उत्साहाचे चित्र पाहायला मिळत होते. मात्र, बदलत्या जीवनशैलीमुळे नागपंचमीच्या सणातील झोक्याची पारंपरिक प्रथा हळूहळू गायब होताना दिसत आहे. (Koregaon Bhima News)
मोबाईल, सोशल मीडिया आणि बदलत्या मनोरंजनाच्या साधनांमुळे पूर्वीच्या ग्रामीण सणातील सामूहिक उत्साह कमी होत चालला आहे. त्यामुळे जुन्या परंपरा व सांस्कृतिक वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचविण्यासाठी अशा सणांच्या माध्यमातून पारंपरिक खेळ, झोके आणि लोकपरंपरा जपण्याची गरज व्यक्त होत आहे. (Koregaon Bhima News)





