#ICCWorldCup2019 : दिमुथ कररुणरत्नेचा विश्वविक्रम
Updated On:

कार्डिफ – न्यूझीलंड संघाने 2019 विश्वचषकाची सुरुवात मोठ्या दिमाखात केली आहे. सलामीच्या सामन्यात श्रीलंकेवर 10 गडी राखून मात करत किवीने आपले इरादे स्पष्ट केले आहेत.
दरम्यान, न्यूझिलंडविरुद्ध झालेल्या सामन्यात श्रीलंकेचा कर्णधार दिमुथ करुणारत्ने याने नवा विश्वविक्रम स्थापित केला आहे. दिमुथने आपल्या संघाच्या डावाची सुरुवात करत नाबाद 52 धावांची विक्रमी खेळी केली. विश्वचषक स्पर्धेत अशी खेळी करणारा तो दुसरा फलंदाज ठरला आहे.
यापूर्वी 1999च्या विश्वचषक स्पर्धेत ऑस्ट्रेलियाच्या जॅकब्स याने डावाची सुरुवात करत नाबाद 49 धावांची खेळी केली होती. आता दिमुथने जॅकब्सचा विक्रम मोडीत काढला आहे. आता विश्वचषक स्पर्धेत डावाची सुरुवात करत नाबाद सर्वाधिक धावा काढण्याचा विक्रम आपल्या नावे नोंदविला आहे.





