दिलजीत दोसांझने मागितली माफी; नेमकं काय घडलं?

Diljit Dosanjh | गायक आणि अभिनेत दिलजीत दोसांझच्या कॉन्सर्टला सध्या तरुण वर्गाकडून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे. दिलजीत सध्या त्याच्या ‘दिल्लुमिनाटी’ या म्यूझिक टूरमुळे जगभरात गाजतोय. सोशल मीडियावर देखील त्याचे व्हिडिओ तुफान व्हायरल होत असतात. मात्र सध्या दिलजीतने सोशल मीडियावर केलेल्या एका पोस्टने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.
दिलजीत दोसांझच्या टीमने इन्स्टाग्रामवर पोस्ट करुन सर्वांची माफी मागितली. या पोस्टमध्ये दिलजीतने लिहिले की, “मी सर्वांची माफी मागतो कारण मला सांगण्यात खूप दुःख होतंय की माझा आगामी पंजाब ९५ हा सिनेमा ७ फेब्रुवारीला रिलीज होणार नाही. ही गोष्ट आमच्या हातात नाही.” अशी पोस्ट दिलजीतने केली. या पोस्टवर दिलजीतच्या चाहत्यांनी निराशा दर्शवली आहे. Diljit Dosanjh |
View this post on Instagram
‘पंजाब ९५’ या सिनेमात १९९० दरम्यान पंजाब पोलिसांनी शिख समुदायातील माणसांवर अत्याचार केला होता, याची कथा दाखवण्यात आली आहे. यावरून वाद होत असल्याने CBFC ने दिलजीतची प्रमुख भूमिका असलेल्या ‘पंजाब ९५’ सिनेमावर एकूण १२० कट सांगितले. त्यामुळेच हा सिनेमा आता नियोजीत रिलीज डेटनुसार म्हणजेच ७ फेब्रुवारीला रिलीज होणार नाही. यामुळे दिलजीतने प्रेक्षकांची माफी मागितली आहे. परंतु ‘पंजाब ९५’ हा सिनेमा ओटीटीवर रिलीज करण्याची मागणी चाहत्यांकडून केली जात आहे. Diljit Dosanjh |
17 जानेवारीला या सिनेमाचा ट्रेलर यूट्यूबवर रिलीज करण्यात आला. यानंतर तो भारतात यूट्यूब वरून काढून टाकण्यात आला, ज्यामुळे चित्रपटाच्या सेन्सॉरशिपचा वाद आणखी वाढला. नंतर या चित्रपटावर भारतातही बंदी घालण्यात आली. आता तो 7 फेब्रुवारीला भारताबाहेर आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रदर्शित होत होता, मात्र पुन्हा एकदा त्याच्या रिलीजमध्ये अडथळा निर्माण झाला आहे.
हेही वाचा:





