पुणे जिल्हा | मंचर येथील ग्रामदेवता मुक्ताबाई मंदिराची दुरवस्था
Updated On:

मंचर, (प्रतिनिधी) – मंचर (ता.आंबेगाव) येथील गावची ग्रामदेवता मुक्ताबाई मंदिराची दुरवस्था झाली असून मंदिर मोडकळीस आले आहे. ग्रामस्थांनी मंदिराचा जीर्णोद्धार करण्यासाठी लक्ष द्यावे, अशी मागणी भाविकांनी केली आहे.
ग्रामदेवता मुक्ताबाई मंदिरातील उभे खांब, आडवे वासे आता पावसाळ्यात कोसळून संपूर्ण मंदिर जमिनोस्त होऊन, मोठी दुर्घटना घडू शकते. अतिशय प्राचीन वारसा असणाऱ्या मंदिराचा जिर्णोद्धार होणे गरजेचे आहे. मंदिराचा परिसर मोठा आहे. शेजारीच विश्वकर्माचे मंदिर आहे.
दोन्ही एकत्रितपणे बांधकाम होऊ शकते.उर्वरित जागेत मंचर नगरपंचायतमार्फत ज्येष्ठांसाठी विरंगुळा केंद्र बाग होऊ शकते.
लहान गावात सुध्दा मोठी मंदिरे उभी आहेत. मंचर वासियांसाठी ग्रामदेवता मुक्ताबाई मंदिराचा जीर्णोद्धार करण्यासाठी लक्ष द्यावे, अशी मागणी भाविक भक्तांनी केली आहे.





