मुंबई – साऊथचा सुपरस्टार कमल हासन आपल्या चाहत्यांना सरप्राईज करण्याची एकही संधी सोडत नाही. कमल हासन लवकरच चाहत्यांमध्ये खळबळ माजवताना दिसणार आहे. सध्या अभिनेता त्याच्या ‘इंडियन 2’ चित्रपटामुळे सतत चर्चेत आहे. त्याचबरोबर या चित्रपटाचा फर्स्ट लूक समोर आल्यानंतर सिनेरसिकांमध्ये एक वेगळाच उत्साह पाहायला मिळत आहे. चित्रपटातील अभिनेत्याच्या फर्स्ट लूकने चाहत्यांवर आपली जादू चालवली आहे.
कमल हासनचा ‘इंडियन 2’ हा सिनेमा 1996 मध्ये आलेल्या ‘इंडियन’ या सिनेमाचा सीक्वेल आहे. सध्या या सिनेमाच्या पोस्ट प्रोडक्शनचं काम सुरू आहे. ‘इंडियन 2’ या सिनेमाच्या माध्यमातून कमल हासन आणि एस. शंकर या जोडीने अनेक वर्षांनी एकत्र काम केले आहे.
View this post on Instagram
दरम्यान, रिलीजआधीच या सिनेमाचा जलवा पाहायला मिळाला आहे. रिलीजआधीच 200 कोटींमध्ये या सिनेमाचे ओटीटी राइट्स विकले गेले असल्याचं सांगण्यात आलं आहे. त्यामुळे आगामी काळात हा सिनेमा सुपरहिट होणार असल्याचं दिसत आहे.
या सिनेमाच्या माध्यमातून पुन्हा एकदा कमल हासन रुपेरी पडदा गाजवण्यासाठी सज्ज आहे. ‘इंडियन 2’ हा 1994 मध्ये आलेल्या सुपरहिट चित्रपट ‘इंडियन’चा दुसरा भाग आहे. ‘इंडियन 2’ मध्ये कमल हसन व्यतिरिक्त काजल अग्रवाल आणि रकुल प्रीत सिंह देखील दिसणार आहेत. त्यामुळे हा चित्रपट सिनेरसिकांसाठी एक जबरदस्त मेजवानी असणार आहे.