महापालिका शाळांत मिळणार डिजिटल माध्यमातून शिक्षण

पुणे  – सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून ई-लर्निंग आणि व्हर्च्युअल क्‍लासरूमद्वारे चांगल्या गोष्टी शिकण्याची संधी महापालिकेने उपलब्ध करून दिली आहे. आधुनिक तंत्रज्ञानाच्या काळात महापालिकेने घेतलेला निर्णय ऐतिहासिक आणि क्रांतीकारी आहे, असे प्रतिपादन खासदार गिरीश बापट यांनी केले.

महापालिकेच्या 265 शाळांमधून ई-लर्निंग प्रकल्प सुरू केला असून, खासदार गिरीश बापट यांच्या हस्ते त्याचे उद्‌घाटन करण्यात आले. यावेळी सिम्बायोसिस विद्यापीठाचे संस्थापक अध्यक्ष डॉ. शां. ब. मुजुमदार प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी महापौर मुक्ता टिळक, नगरसेवक आदित्य माळवे, स्वाती लोखंडे, महापालिका आयुक्त सौरभ राव, शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी, अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल, बीएसएनएलचे जनरल मॅनेजर अनिल धानोरकर, मुख्य कामगार अधिकारी शिवाजी दौंडकर, राहुल जगताप आदी उपस्थित होते.

सध्या केवळ फळा, खडू एवढेच शिक्षणाचे माध्यम आता राहिले नाही. महापालिकेच्या शाळांमधूनही अतिशय गुणवत्तापूर्ण शिक्षण दिले जात आहे. तंत्रज्ञानयुक्त शिक्षण सर्वांसाठीच आता शक्‍य झाल्याचे मत डॉ. मुजुमदार यांनी व्यक्त केले. काळाच्या बरोबर गेले पाहिजे. तंत्रज्ञानाच्या युगात महापालिकेच्या शाळांतील विद्यार्थी कुठेही मागे पडू नये, हा दृस्टीकोन डोळ्यापुढे ठेवून महापालिकेच्या 100 टक्के शाळांतून ई-लर्निंग प्रकल्प सुरू करण्यात येत आहे, असे महापौर म्हणाल्या.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)