Vanita Kharat : डाएट, योगा अन् वर्कआउट; वनिता खरातने घटवलं तब्बल २४ किलो वजन म्हणाली…
Vanita Kharat : ‘नक्की काय शिजतंय’ या कार्यक्रमात सहभागी झालेल्या वनिताने यावेळी तिच्या डाएटबाबतही काही खास गोष्टी शेअर केल्या. या कार्यक्रमात वनिताने सुक्का कोलंबी आणि पापलेट रवा तवा फ्राय या पदार्थांच्या रेसिपी सादर केल्या.

Vanita Kharat : ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या लोकप्रिय कार्यक्रमातून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री वनिता खरात सध्या तिच्या फिटनेस ट्रान्सफॉर्मेशनमुळे चर्चेत आहे. आपल्या विनोदी अभिनयाने प्रेक्षकांचे मनोरंजन करणाऱ्या वनिताने अनेक चित्रपटांमध्येही काम केले आहे.
शाहिद कपूरच्या ‘कबीर सिंग’ या चित्रपटातील भूमिकेमुळे तिची विशेष चर्चा झाली होती. वनिता सध्या आपल्या फिटनेसकडे विशेष लक्ष देत असून, तिने तब्बल २४ किलो वजन कमी केल्याची माहिती स्वतः दिली आहे.
‘नक्की काय शिजतंय’ या कार्यक्रमात सहभागी झालेल्या वनिताने यावेळी तिच्या डाएटबाबतही काही खास गोष्टी शेअर केल्या. या कार्यक्रमात वनिताने सुक्का कोलंबी आणि पापलेट रवा तवा फ्राय या पदार्थांच्या रेसिपी सादर केल्या. यावेळी तिच्या वजन कमी करण्याच्या प्रवासाबाबत विचारण्यात आले असता, तिने आपण २४ किलो वजन कमी केल्याचे सांगितले.
View this post on Instagram
वनिताने आपल्या खाण्याच्या आवडींबद्दलही खुलासा केला. तिला मासे खायला विशेष आवडत असल्याचे तिने सांगितले. मात्र, वजन कमी करण्याच्या काळात तिने आपल्या आहारावर बरेच नियंत्रण ठेवले. कार्यक्रमातील पदार्थ खात असल्याबाबत बोलताना तिने हा आपला ‘चीट डे’ असल्याचे सांगितले.
भाजलेला बांगडा आणि पिठी भात हे आपले आवडते पदार्थ असल्याचेही वनिता म्हणाली. वनिताने वजन कमी करण्यासोबतच नियमित व्यायाम आणि योगालाही महत्त्व देत असल्याचे स्पष्ट केले.
ती सोशल मीडियावर सतत सक्रिय असून व्यायाम आणि योगाचे फोटो चाहत्यांसोबत शेअर करत असते. तिच्या फिटनेस ट्रान्सफॉर्मेशनची सध्या सोशल मीडियावरही जोरदार चर्चा होत आहे.
Solapur : सोलापूरच्या गणेश विसर्जनाच्या मिरवणुकीत तुकाराम मुंढेंचा देखावा





