Solapur : सोलापूरच्या गणेश विसर्जनाच्या मिरवणुकीत तुकाराम मुंढेंचा देखावा
Solapur : सोलापूरच्या गणेश विसर्जन मिरवणुकीत अन्न आणि औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या कार्यावर आधारित आकर्षक देखावा साकारण्यात आला आहे.

Solapur : सोलापूरच्या गणेश विसर्जन मिरवणुकीत अन्न आणि औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या कार्यावर आधारित आकर्षक देखावा साकारण्यात आला आहे.
विजापूर रोड येथील पंचमुखी क्रीडा, कला व संस्कृती गणेश मंडळाने हा देखावा साकारला असून, अन्नभेसळीविरोधात राबविण्यात आलेल्या मोहिमा, कारवाया आणि जनजागृती उपक्रमांची माहिती फलकांच्या माध्यमातून मांडण्यात आली आहे.
नागरिकांनी भेसळयुक्त अन्न टाळावे आणि सुरक्षित, दर्जेदार अन्नपदार्थांची निवड करावी, याबाबतही या देखाव्यातून जनजागृती करण्यात आली आहे. गणेशोत्सवाच्या माध्यमातून सामाजिक संदेश देण्याचा मंडळाचा हा प्रयत्न असून, विसर्जन मिरवणुकीत या देखाव्याने नागरिकांचे लक्ष वेधून घेतले आहे.