TMC : ऋतब्रत गटाची मोठी खेळी! TMCचं नाव-चिन्ह गोठवल्यानंतर ‘या’ तीन नावांचे पर्याय निवडणूक आयोगाकडे सादर
TMC : आता निवडणूक आयोगाने पक्षाचे चिन्ह आमि नाव गोठवले असून मोठ्या राजकीय घडामोडींना वेग आला आहे.

Internal political developments in West Bengal gain momentum : पश्चिम बंगालच्या राजकारणात तृणमूल काँग्रेसमधील अंतर्गत वादाला आता नवं वळण मिळालं आहे. तृणमूल काँग्रेसमधील (TMC) अंतर्गत बंडखोरीनंतर माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना मोठा धक्का बसला आहे.
आता निवडणूक आयोगाने पक्षाचे चिन्ह आमि नाव गोठवले असून मोठ्या राजकीय घडामोडींना वेग आला आहे. पक्षातील दोन गटांमधील वादाच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने अंतरिम आदेश जारी करत आगामी पोटनिवडणुकांपुरते ‘ऑल इंडिया तृणमूल काँग्रेस’ हे पक्षनाव आणि ‘जोडाफूल’ हे राखीव निवडणूक चिन्ह वापरण्यास दोन्ही गटांना मनाई केली आहे.
निवडणूक आयोगाने दोन्ही गटांना स्वतंत्र नाव आणि मुक्त चिन्ह निवडण्यासाठी पर्याय सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. १८ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजेपर्यंत प्रत्येकी तीन नावांचे आणि तीन मुक्त चिन्हांचे पर्याय देण्यास सांगण्यात आले आहे.
ऋतब्रत बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील गटाकडून नव्या पक्षासाठी तीन नावांचे पर्याय सादर करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये नॅशनलिस्ट तृणमूल काँग्रेस, डेमोक्रेटिक तृणमूल काँग्रेस आणि वेस्ट बंगाल तृणमूल काँग्रेस या नावांचा समावेश आहे.
१७ सप्टेंबरला निवडणूक आयोगासमोर सुनावणी
TMCच्या पक्षनाव आणि निवडणूक चिन्हावरून सुरू असलेल्या वादावर १७ सप्टेंबर रोजी निवडणूक आयोगासमोर सुनावणी झाली. ममता बॅनर्जी आणि ऋतब्रत बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील दोन्ही गटांनी आपापली बाजू आयोगासमोर मांडली.
ऋतब्रत गटाने आगामी पोटनिवडणुका लक्षात घेऊन तातडीने स्वतंत्र नाव आणि चिन्ह देण्याची मागणी केली. दुसरीकडे, ममता बॅनर्जी यांच्या गटाने अंतरिम आदेशाला विरोध केला. या प्रकरणावर निवडणूक आयोगाचा अंतिम निर्णय अद्याप बाकी आहे.
पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठी घडामोड
पश्चिम बंगालमधील नंदिग्राम आणि रेजिनगर विधानसभा मतदारसंघांच्या पोटनिवडणुका ६ ऑक्टोबर रोजी होणार आहेत. या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर दोन्ही गटांना स्वतंत्र पक्षनाव आणि चिन्हाची आवश्यकता निर्माण झाली आहे. त्यामुळे निवडणूक आयोग कोणत्या गटाला कोणते नाव आणि चिन्ह मंजूर करतो, याकडे आता लक्ष लागले आहे.





