सुष्मिता सेनला बोलतांना होतोय ‘त्रास’ ; नेमकं झालं काय ?

Sushmita Sen । ज्येष्ठ बॉलिवूड अभिनेत्री आणि माजी मिस युनिव्हर्स सुष्मिता सेनचा नुकताच एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओ तीला बोलतांना त्रास होत असल्याचे दिसून येत आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहून तिचे चाहतेही चिंता व्यक्त करत आहे.
हा व्हिडिओ मुंबईतील डेन्टल केअरबाहेर आहे. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये सुष्मिताला लोकल ऍनेस्थेसियाचा भारी डोस घेतल्यानंतर बोलण्यात त्रास होत असल्याचे दिसत आहे. ती तिच्या कारमधून निघण्यापूर्वी पापाराझींना शुभेच्छा देताना आणि गप्पा मारताना दिसली.
इंस्टाग्रामवर पापाराझींनी शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये, सुष्मिता सेन तिच्या बॉयफ्रेंड रोहमन शॉलसोबत वांद्रे येथील डेंटल क्लिनिकच्या बाहेर दिसला. पापाराझींसोबतच्या या संवादादरम्यान ती म्हणते की ती हसू शकत नाही. यावेळी तिला नीट बोलता येत नसल्यचे समजते. दातदुखीनंतर तिला बहुधा लोकल ऍनेस्थेसियाचा भारी डोस देण्यात आला होता. जेव्हा पापाराझीने विचारले कधी बरी होशील, तेव्हा अभिनेत्रीने सांगितले की तिला आशा आहे की एका दिवसात वेदना कमी होईल. यानंतर तिने सर्वांशी हस्तांदोलन केले आणि गाडीतून निघून गेली.
सुष्मिता सेनच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे तर, ती शेवटची क्राईम-थ्रिलर वेब सीरिज आर्याच्या तिसऱ्या सीझनमध्ये दिसली होती, जी प्रेक्षकांना खूप आवडली होती. तिने ‘ताली’ मध्ये श्री गौरी सावंत या ट्रान्सजेंडर कार्यकर्त्याची भूमिका देखील केली होती, या मालिकेने प्रेक्षकांवर फारसा प्रभाव सोडला नाही, परंतु समीक्षकांनी सुष्मिताच्या अभिनयाचे खूप कौतुक केले. काही महिन्यांपूर्वी सुष्मिता सेनने रिया चक्रवर्तीच्या पॉडकास्टमध्ये तिच्या आयुष्यातील अनेक पैलूंवर मोकळेपणाने चर्चा केली होती. ज्यामध्ये तिचे मुलींसोबतचे खास नातेही ठळकपणे दिसून आले.





