अनन्या पांडेनी केली लिप सर्जरी? लेटेस्ट फोटो पाहून नेटकऱ्यांनी केलं ट्रोल

Ananya Panday | अभिनेत्री अनन्या पांडे हिने अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. मात्र बॉलिवूडमध्ये पदार्पण केल्यापासून अनन्या तिच्या खासगी आयुष्यामुळे कायम चर्चेत असते. सध्या अनन्याचे लेटेस्ट फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामुळे तिच्यावर मोठ्या प्रमाणात टीका केली जात आहे.
अनन्याने तिच्या इंस्टाग्राम हँडलवर तिचे अनेक फोटो शेअर केले आहेत. ज्यामध्ये ती कारमध्ये तिच्या टॅन्ड लूकमध्ये पाउट करताना दिसत आहे. यात अनन्याच्या ओठांचा आकार बदलेला दिसून येत आहे. तिच्या या पोस्टवर नेटकऱ्यांनी ती दिशा पटानीसारखी दिसत असल्याचे म्हंटले आहे. एका युजरने विचारलं, “फिलर्स, बोटॉक्स का?”. तर काहींना तिच्या या लुकचे कौतुकही केले आहे. nanya Panday |
View this post on Instagram
अनन्या पांडे सध्या तिच्या ‘तू मेरी मैं तेरा मैं तेरा तू मेरी’ या चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यस्त आहे. यात ती कार्तिक आर्यनसोबत दिसणार आहे. गेल्या काही वर्षांपूर्वी ‘पती पत्नी और वो’ या चित्रपटात कार्तिक आणि अनन्याने पहिल्यांदा एकत्र काम केलं होतं. या वर्षाच्या सुरुवातीला ती ‘केसरी चॅप्टर 2’ मध्ये दिसली होती. Ananya Panday |
वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचं झालं तर, अनन्या यापूर्वी आदित्य रॉय कपूरला डेट करत होती, पण त्यांचा ब्रेकअप झाला. त्यानंतर तिचं नाव वॉकर ब्लँकोशी जोडलं गेलं. तो एक अमेरिकन मॉडेल आहे, जो गुजरातच्या जामनगरमध्ये अंबानी कुटुंबाच्या ‘वंतारा’मध्ये काम करतो. मात्र अद्याप अनन्याने या नात्याची पुष्टी केलेली नाही. Ananya Panday |
हेही वाचा:
नियतीचा क्रूर खेळ ! डॉक्टर दाम्पत्यासह ३ मुलांचा विमान अपघातात मृत्यू; सेल्फी ठरला शेवटचा क्षण…




