Rahul Gandhi : राज ठाकरे आणि राहुल गांधींमध्ये संवाद? राऊतांच्या दाव्याने मनसे इंडिया आघाडीत सहभाग होण्याच्या चर्चांना उधाण
Raj Thackeray : मुंबईत 2 ऑक्टोबरला मोठे आंदोलन

Rahul Gandhi : मनसे प्रमुख राज ठाकरे आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या संवाद आहे आणि दोघांमध्ये का संवाद असू नये? ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी असे विधान केल्याने राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क काढले जात आहेत. संजय राऊत यांनी मीडियाशी संवाद साधताना हा दावा केला आहे.
राज ठाकरे हे विरोधकांचा आवाज बनून काम करत आहेत. त्यांना इंडिया आघाडीत घेणार का? आजच्या इंडिया आघाडीच्या बैठकीत तसा काही निर्णय होणार आहे का? असा सवाल संजय राऊत यांना करण्यात आला. त्यावेळी राऊत यांनी हा दावा केला की, ‘आजची इंडिया आघाडीची बैठक ज्ञानेश कुमार आणि निवडणूक आयोग या मर्यादित अजेंड्यावर केंद्रित आहे. राज ठाकरेंना सोबत घेण्याचा विषय भविष्यात केव्हा तरी चर्चेला स्वतंत्र मुद्दा म्हणून येईल, आजच्या बैठकीचा तो विषय नाही,’ असे त्यांनी स्पष्ट केले.
तसेच राज ठाकरे आणि राहुल गांधी यांच्यात संवाद आहे. संवाद का असू नये? सर्व विरोधी पक्ष एकमेकांशी संवाद साधतात. तर मुंबईतील आंदोलनाच्या तयारीमुळे उद्धव ठाकरे प्रत्यक्ष दिल्लीला जाऊ शकले नाहीत, परंतु दुपारी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे इंडिया आघाडीच्या बैठकीत सहभागी होतील, असेही त्यांनी सांगितले.
मुंबईत 2 ऑक्टोबरला मोठे आंदोलन (Rahul Gandhi)
संजय राऊत यांनी सांगितले की, मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार आणि निवडणूक आयोगाच्या विरोधात मुंबईत 2 ऑक्टोबरला अभिजीत दीपके यांच्या नेतृत्वाखाली मोठे आंदोलन होत आहे. आंदोलनाची धग जशी वाढेल आणि दिल्लीपर्यंत पोहोचेल. आंदोलनाचा भडका उडाल्यावर ज्ञानेश कुमारांचा राजीनामा घ्यावा लागेल किंवा त्यांना बडतर्फ करावे लागेल.
शरद पवार इंडिया आघाडीसोबतच (Rahul Gandhi)
ते पुढे म्हणाले की, “शरद पवार कुठेही जाणार नाहीत. ते इंडिया ब्लॉक आणि महाविकास आघाडीचे अत्यंत महत्त्वाचे स्तंभ आहेत. त्यांच्याबाबतच्या बातम्या कल्पित आहेत. पवारांचा मूळ पक्ष कुठे जाणार नाही. तो केंद्रात इंडिया आघाडी आणि राज्यात महाविकास आघाडीसोबत राहील,” असं राऊत यांनी स्पष्ट केले आहे.
हेही वाचा:
Pradeep Bhandari: ‘राम-शिवांमध्ये फूट…’ ; राहुल गांधी-रेवंत रेड्डींवर भाजपची टीका





