Accident News : महाराष्ट्रात अपघातांचे तांडव! नाशिकनंतर धुळ्यात भीषण अपघात; तिघांचा मृत्यू
Accident News : धुळे-सुरत महामार्गावर तामसवाडी फाट्याजवळ वऱ्हाड्यांच्या गाडीला अपघात होऊन ३ जणांचा मृत्यू झाला आहे.
Updated On:

Accident News : नाशिक येथील भीषण अपघाताची घटना ताजी असतानाच आता धुळे जिल्ह्यातून आणखी एक गंभीर दुर्घटना समोर आली आहे. लग्नाच्या वऱ्हाडींच्या वाहनाला झालेल्या अपघातात तिघांचा मृत्यू झाला असून चार ते पाच जण गंभीर जखमी झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, धुळे-सुरत महामार्गावरील तामसवाडी फाटा येथे वाहन अनियंत्रित होऊन दुभाजकाला धडकले. या भीषण अपघातात तीन जणांचा जागीच मृत्यू झाला. जखमींना तातडीने शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असून काहींची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे.
दरम्यान, यापूर्वी दिंडोरी (नाशिक) येथे घडलेल्या अपघातात ९ जणांचा मृत्यू झाला होता. कार विहिरीत कोसळल्याने ही दुर्घटना घडली होती. या घटनेने संपूर्ण राज्य हादरले असताना आता धुळेतील अपघातामुळे चिंता अधिक वाढली आहे.
दोन्ही घटनांमुळे राज्यात शोककळा पसरली असून प्रशासनाकडून अपघातांच्या कारणांचा तपास सुरू आहे.





