Dhruv Jurel Stumping : ध्रुव जुरेलच्या स्टंपिंगमध्ये दिसली ‘धोनी’ची शैली! एका हाताने चेंडू पकडत बॅट्समनचा गेम केला खल्लास, पाहा VIDEO
Dhruv Jurel Stumping : जुरेलच्या या चपळाईने क्रिकेट चाहत्यांना थेट एमएस धोनीची आठवण करून दिली.

Dhruv Jurel Stumping Video Viral : आयपीएल २०२६ च्या २८ व्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सने (KKR) राजस्थान रॉयल्सवर विजय मिळवून अखेर विजयाचे खाते उघडले. मात्र, या सामन्यात केकेआरच्या विजयाइतकीच चर्चा राजस्थानचा यष्टीरक्षक ध्रुव जुरेल याने केलेल्या एका अजब स्टंपिंगची होत आहे. जुरेलच्या या चपळाईने क्रिकेट चाहत्यांना थेट एमएस धोनीची आठवण करून दिली.
या सामन्यात राजस्थानच्या १५६ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना कोलकाताची सुरुवात खराब झाली होती. अशातच कॅमेरून ग्रीनने आक्रमक पवित्रा घेत डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र, पाचव्या षटकात रवी बिश्नोईच्या चेंडूवर ग्रीनने पुढे सरसावत मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला. बिश्नोईने ग्रीनची चाल ओळखून चेंडूची लाईन बदलली आणि लेग साईडला वाईड टाकला.
डाईव्ह मारली अन् चेंडू स्टंपवर फेकला!
THAT’s SOME STUMPING! 🤯
🎥 Dhruv Jurel off balance & diving away from the stumps but hits the target 🎯
Updates ▶️ https://t.co/776nTdPbPj#TATAIPL | #KhelBindaas | #KKRvRR | @rajasthanroyals pic.twitter.com/lqjSajx2iO
— IndianPremierLeague (@IPL) April 19, 2026
चेंडू लेग साईडला जात असताना ध्रुव जुरेलने डाव्या बाजूला डाईव्ह मारत चेंडू पकडला. मात्र, डाईव्ह मारल्यामुळे तो जमिनीवर पडला होता आणि त्याला स्टंपजवळ पोहोचणे शक्य नव्हते. अशा वेळी जुरेलने जमिनीवर पडून असतानाच चेंडू स्टंपच्या दिशेने फेकला. चेंडू थेट स्टंपला लागला आणि तोपर्यंत कॅमेरून ग्रीन क्रीजच्या खूप बाहेर होता. ग्रीनला चकित करणाऱ्या या स्टंपिंगचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर ‘धोनी स्टाईल’ म्हणून गाजत आहे. ग्रीन २७ धावा करून माघारी परतला.
रिंकू आणि अनुकूलची ऐतिहासिक भागीदारी –
एका वेळी ८५ धावांवर ६ विकेट्स गमावलेला कोलकाता संघ पराभवाच्या छायेत होता. पण तिथून रिंकू सिंग आणि अनुकूल रॉय यांनी सूत्रे हाती घेतली. या जोडीने ७ व्या विकेटसाठी ७६ धावांची अभेद्य भागीदारी रचली. आयपीएल इतिहासात यशस्वी पाठलाग करताना ७ व्या विकेटसाठी झालेली ही दुसरी सर्वात मोठी भागीदारी ठरली आहे. या जोडीच्या जोरावर कोलकात्याने १९.४ षटकांत विजय साकारत हंगामातील आपला पहिला विजय नोंदवला.





