पुण्यात धो-धो पावसाला सुरूवात; पुन्हा पुराचा धोका? रेड अलर्ट जारी

Pune Rain Update| पुण्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाची संततधार सुरूच आहे. मागील आठवड्यात मुसळधार पाऊस आणि पूरस्थितीने नागरिकांचे मोठे नुकसान झाले. यानंतर आज 4 जुलै रोजी सकाळपासूनच पुण्यात पावसाला सुरूवात झाली आहे. तर धरण परिसरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पुन्हा एकदा धरणातून पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणावर वाढवण्यात येत आहे.
खडकवासला धरणाच्या सांडव्यावरून मुठा नदी पात्रामध्ये सुरू असणारा 29414 क्युसेक विसर्ग वाढवून सकाळी 11:00 वा. 35002 क्यूसेक करण्यात येत आहे. आवश्यकतेनुसार बदल संभवू शकतो. तर वरसगाव धरणाच्या सांडव्यावरून मुठा नदी पात्रामध्ये सुरू असणारा 7703 क्युसेक विसर्ग वाढवून सकाळी 11 वा. 9885 क्युसेक व विद्युत गृहद्वारे 600 क्युसेक असा एकूण 10485 करण्यात येणार आहे. त्यामुळे नदी काठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. Pune Rain Update|
मागील आठवड्यात पुरामुळे दीडशेहून अधिक घरांना फटका
या दृष्टीने प्रशासनाने योग्य ती खबरदारी घेण्यास सुरूवात केली आहे. पुण्यातील सिंहगड रोड परिसरात असणाऱ्या एकता नगर या भागात जवान तैनात करण्यात येणार आहे, जेणेकरून कोणतीही अडचण किंवा या भागात पुरस्थिती निर्माण झाल्यास तातडीने उपाययोजन करता येतील.
दरम्यान, मागील आठवड्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे सिंहगड रस्त्यावरील एकता नगर परिसरातील विठ्ठलवाडी, निंबजनगर भागात पूरस्थिती उद्भवली होती. या पुरामुळे जवळपास दीडशेहून अधिक घरांना फटका बसला. या भागात पुन्हा पूरस्थिती उद्भवू नये, यासाठी तातडीने पूर संरक्षक मजबूत भिंत बांधणे सुरू करण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शनिवारी दिले. Pune Rain Update|
धरणाच्या पाणीसाठयात झपाटयाने वाढ
पाटबंधारे विभागाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, शनिवारी दिवसभरात खडकवासला धरणाच्या पाणलोट क्षेत्रात ८ मिमी पाऊस झाला असून पानशेत पाणलोट क्षेत्रात ४५ मिमी, वरसगाव पाणलोट क्षेत्रात ४९ मिमी तर टेमघर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात ३५ मिमी पावसाची नोंद झाली आहे. मात्र, घाटमाथ्यावर मोठया प्रमाणात पाऊस होत असल्याने धरणांमध्ये मोठया प्रमाणात पाण्याचा येवा असल्याने पाणीसाठयात झपाटयाने वाढ होत असल्याने मुठा नदीत मोठया प्रमाणात पाण्याचा विसर्ग करावा लागत आहे. Pune Rain Update|
रेड अलर्ट जारी
पुणे आणि सातारा या जिल्ह्याला रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळे या जिल्ह्यांमध्ये घाट भागामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. भारतीय हवामान खात्याच्या माहितीनुसार, पुढील ३-४ तासांत नाशिक व पुणे घाट, रायगड, ठाणे या जिल्ह्यात काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे.
हेही वाचा:
“कांदा मुळा भाजी, अवघी विठाई माझी” ; सावता महाराजांची पुण्यथिती वाल्ह्यात साजरी





