Dhirendra Shastri: “एखाद्याच्या आईला किंवा कुटुंबाला शिवीगाळ करणे…” ; धीरेंद्र शास्त्री यांचा GENZ ला मोलाचा सल्ला
Dhirendra Shastri: मध्य प्रदेशातील कटनी जिल्ह्याच्या दौऱ्यावर असलेले बागेश्वर धाम सरकारचे पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी दिल्लीतील जंतर मंतर येथील आंदोलनांवर प्रतिक्रिया दिली.

Dhirendra Shastri: मध्य प्रदेशातील कटनी जिल्ह्याच्या दौऱ्यावर असलेले बागेश्वर धाम सरकारचे पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी दिल्लीतील जंतर मंतर येथील आंदोलनांवर प्रतिक्रिया दिली.
यावेळी बोलताना त्यांनी,”आपली मते व्यक्त करणे योग्य आहे, परंतु कोणाच्या आईबद्दल अपमानास्पद भाषा वापरणे योग्य नाही. आपण वादाऐवजी संवादाला प्राधान्य दिले पाहिजे” असे त्यांनी म्हटले. (Dhirendra Shastri)
ते पुढे म्हणाले की, “आंदोलन करणे हा प्रत्येकाचा लोकशाही हक्क आहे, परंतु आंदोलनादरम्यान अपमानास्पद भाषा वापरणे कोणत्याही परिस्थितीत योग्य नाही.”
कटनी दौऱ्यादरम्यान त्यांनी भारतीय संस्कृतीचा सन्मान, सुसंस्कृत संवाद आणि धार्मिक श्रद्धा जपण्याचा संदेशही दिला. धीरेंद्र शास्त्री यांनी कटनीच्या कुथला परिसरात त्यांच्या शिष्यांनी बांधलेल्या नवीन बागेश्वर बालाजी मठाला भेट दिली. तेथे त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
Katni, Madhya Pradesh: On the Gen-Z protest at Delhi’s Jantar-Mantar, The head of Bageshwar Dham, Pandit Dhirendra Krishna Shastri, says, “There is nothing wrong with expressing your own views, but it is wrong to speak ill of others. Everyone has the right to express their… pic.twitter.com/R1aVTuNzsK
— IANS (@ians_india) August 2, 2026
“वाद नको संवाद करा ” (Dhirendra Shastri)
धीरेंद्र शास्त्री म्हणाले, “संवाद, वाद नको.” कटनी दौऱ्यावर असलेले धीरेंद्र कृष्णशास्त्री प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हणाले की, प्रत्येकाला आपली मते व्यक्त करण्याचा आणि निषेध करण्याचा अधिकार आहे, परंतु कोणाच्या आई किंवा कुटुंबाविरुद्ध अपमानास्पद भाषा वापरणे हे भारतीय संस्कृती आणि सभ्यतेच्या विरोधात आहे.
धीरेंद्र कृष्णशास्त्री म्हणाले, “आज संपूर्ण जग भारताकडे पाहत आहे, त्यामुळे आपण वादाचा नव्हे, तर संवादाचा मार्ग स्वीकारला पाहिजे.” त्यांनी तरुणांना नेहमी आपली मते सुसंस्कृत आणि सन्मानजनक पद्धतीने व्यक्त करण्याचे आवाहन केले.
धीरेंद्र कृष्णशास्त्री यांनी कटनी दौऱ्यादरम्यान केलेले हे वक्तव्य आता चर्चेचा विषय बनले आहे. त्यांनी तरुणांना केवळ लोकशाही हक्कांचाच नव्हे, तर भाषा, संस्कृती आणि सामाजिक शिष्टाचाराचाही आदर करण्याचे आवाहन केले.
कावड यात्रेबद्दल ते काय म्हणाले? (Dhirendra Shastri )
श्रावण महिना आणि कावड यात्रेचा संदर्भ देत ते म्हणाले की, पूर्ण भक्तीभावाने भगवान शिवाची पूजा करावी, परंतु कोणाच्याही भावना दुखावणारे किंवा धर्मावर प्रश्नचिन्ह निर्माण करणारे कोणतेही कृत्य टाळावे. त्यांनी प्रेम, संयम आणि सामाजिक सलोखा राखण्याचा संदेशही दिला.





