Dhirendra Krishna Shastri । Dhananjay Munde । Santosh Deshmukh : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाल्याची धक्कादायक घटना काही दिवसांपूर्वी घडली. सदर घटनेतील काही आरोपींना पोलिसांनी अटक केली. मात्र, या घटनेतील मुख्य आरोपी अद्यापही फरार आहेत, त्यांना अटक करण्याच्या मागणीसाठी आणि संतोष देशमुख यांच्या हत्येच्या घटनेच्या निषेधार्थ बीडमध्ये आक्रोश मोर्चाही काढण्यात आला. या प्रकरणावरून आता सर्वच स्तरातून प्रतिक्रिया समोर येत आहेत. अनेक राजकीय नेत्यांनी तर अजित पवार गटाचे नेते धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. आता याप्रकरणी बागेश्वर धामचे पीठाधीश्वर पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी एक मोठे वक्तव्य केले आहे. नुकतंच जळगावच्या धरणगाव तालुक्यातील झुरखेडा गावात धीरेंद्र शास्त्री महाराज यांचे कार्यक्रम पार पडला. यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विविध विषयांवर भाष्य केले. यावेळी त्यांना बीड हत्याप्रकरणीही विचारणा करण्यात आली. यावर देखील त्यांची भाष्य केलं आहे. ते म्हणाले की, “देशात एक मोठा चिंतेचा विषय बनला आहे. मानस तर आहेत मात्र माणसांमधील माणुसकी मरत आहे. कमी होत आहे. आधीच्या काळात माणसं कमी होते, मात्र माणुसकी सर्वात जास्त होती. आज माणसे जास्त आहेत, मात्र माणुसकी मरण पावली आहे. माणुसकी मरत असल्याने कृत्य आणि अपराध हे वाढत आहेत. कुत्र्यासारख वागणं, माणसामध्ये प्रवेश करत असल्याने वारंवार छोट्या छोट्या अल्पवयीन मुलींवरील अत्याचार, अपहरण यासारख्या गुन्हे वाढत आहेत. अशा प्रकारचे गुन्हे कमी व्हावेत यासाठी शिक्षा व्हायला हवी. अशा गुन्ह्यांबद्दल जनजागृती व्हायला हवी. तसेच हे गुन्हे करणाऱ्यांना कठोरात कठोर शिक्षा, त्यांच्यावर सामाजिक बहिष्कार, हेच यामागचे उपाय आहेत”. असं बागेश्वर धामचे पीठाधीश्वर पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी सांगितले. ‘तो’ माझ्या आयुष्यातीला सर्वात अविस्मरणीय क्षण होता…. महाराष्ट्र हे आमचे सर्वात आवडते राज्य आहे. भारताचा हिंदू आणि युवा वर्ग हा जागृत होत आहे. देश एका नव्या क्रातींच्या दिशेने प्रवास करतो आहे. जळगाव जिल्ह्यातील लोकांचे जे प्रेम मिळालं, या ठिकाणचा बैलगाडीवरचा प्रवास, हा माझ्या आयुष्यातीला सर्वात अविस्मरणीय क्षण होता. छोट्या छोट्या मुलांच्या कपाळावर छत्रपती शिवाजी महाराजांचे टिळा पाहून असं वाटलं की, छोट्या छोट्या मुलांचे रूपाने वीर छत्रपती शिवाजी महाराज… हिंदवी स्वराज्याचा स्थापनेसाठी पुन्हा आले आहेत, असे धीरेंद्र शास्त्री यावेळी म्हणाले.