Dharmendra Pradhan Resign: सर्वात मोठी बातमी! अखेर धर्मेंद्र प्रधानांचा केंद्रीय शिक्षणमंत्री पदाचा राजीनामा
Dharmendra Pradhan Resign: पंतप्रधान मोदी यांच्या कार्यकाळात एखाद्या आंदोलनानंतर केंद्रीय मंत्र्याला राजीनामा देण्याची ही पहिलीच वेळ

Dharmendra Pradhan Resign: केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे त्यांनी राजीनामा सूपूर्द केला आहे.
नीट पेपरफुटीनंतर सीजेपी (CJP) च्या नेतृत्वाखाली विद्यार्थी त्यांच्या राजीनाम्याची मागणी करत एका महिन्याहून अधिक काळापासून निदर्शने करत होते. तसेच सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी या मुद्द्यावर २६ दिवस उपोषण केले होते. त्यानंतर अखेर आज धर्मेंद्र प्रधान यांनी आपला मंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. (Dharmendra Pradhan Resign)
दरम्यान, या आंदोलनाची व्याप्ती आणखी वाढून केंद्र सरकाविरोधात असंतोष वाढत चालला होता. त्यामुळे केंद्र सरकारला अखेर धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्यावा लागला आहे. विशेष म्हणजे पंतप्रधान मोदी यांच्या कार्यकाळात एखाद्या आंदोलनानंतर केंद्रीय मंत्र्याला राजीनामा द्यावा लागण्याची ही पहिलीच वेळ आहे. (Dharmendra Pradhan Resign)
Union Education Minister Dharmendra Pradhan resigns.
“…To ensure that anti-national elements are not benefitted by the situation at Jantar Mantar and across the country, that the nation remains united, students in India do not get tangled in legal complexities and focus on… https://t.co/sbtiMMhrgp pic.twitter.com/DPdZwn8q7i
— ANI (@ANI) July 25, 2026
भारताची युवाशक्तीच या देशाची खरी ताकद
दरम्यान, धर्मेंद प्रधान यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे की, “मी नेहमीच आपल्या लोकशाहीच्या ताकदीवर अढळ विश्वास ठेवणारा राहिलो आहे आणि तरुणांच्या आकांक्षा, स्वप्ने व अपेक्षांचा मनापासून आदर करत आलो आहे. ते केवळ भारताचे भविष्यच नाहीत, तर एका नव्या आणि विकसित भारताचे वाहक, निर्माते आणि भविष्याचे शिल्पकारसुद्धा आहेत. गेल्या १० दिवसांचा घटनाक्रम पाहून माझे मन दुःखी आहे. हा माझ्यासाठी वैयक्तिक प्रतिष्ठेचा विषय नाही. भारताची युवाशक्तीच या देशाची खरी ताकद आहे.
— Dharmendra Pradhan (@dpradhanbjp) July 25, 2026
देशाच्या युवाशक्तीला भ्रमाच्या चक्रव्यूहात फसू देणार नाही, हाच माझा संकल्प आहे. जंतर-मंतरवर आणि देशात जी परिस्थिती निर्माण झाली आहे, त्या परिस्थितीचा राष्ट्रविरोधी शक्तींनी फायदा घेऊ नये, देशाची एकता कायम राहावी, भारतातील एकाही विद्यार्थ्याचे भविष्य कायदेशीर अडचणींत अडकू नये, आपल्या मुलांनी त्यांचा वेळ अभ्यासात घालवावा आणि करिअर घडवण्यावर भर द्यावा, याच गोष्टीचा विचार करून मी माझा राजीनामा आदरणीय पंतप्रधानांकडे पाठवला आहे,” असे त्यांनी धर्मेंद प्रधान यांनी सांगितले आहे.
हेही वाचा:





