अच्छा तो हम चलते हैं..! धरम पाजींच्या ‘त्या’ पोस्टमुळे चाहत्यांची चिंता वाढली

Dharmendra । बॉलिवूडचे सुप्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांची अनेक चित्रपट सुपरहिट ठरले आहेत. वयाची 80 वर्षांनंतर देखील ते चित्रपटांमध्ये त्याच उत्साहात काम करताना दिसतात. नुकतेच धर्मेंद्र यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यामुळे चाहत्यांना चिंता वाटू लागली आहे.
धर्मेंद्र यांनी एक्स अकाऊंटवर एका चित्रपटातील त्यांचा एक ब्लॅक अँड व्हाइट फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये ते एका झाडाखाली उभे असलेले दिसत आहेत. हा फोटो शेअर करत धर्मेंद्र यांनी ‘अच्छा तो हम चलते हैं’ असे कॅप्शन दिले आहे.
सध्या सोशल मीडियावर धर्मेंद्र यांच्या या पोस्टची चांगलीच चर्चा रंगली आहे. अनेकजण कमेंट करत त्यांच्या प्रकृतीची विचारणा करत आहेत. तर आणखी एका पोस्टमध्ये त्यांनी ‘गालियाँ होवन सुन्नियों। ,,,,,, जत्थे मिर्ज़ा यार फिरे ,,,,,,’ असं कॅप्शन दिले होते. मागील काही दिवसांपासून धर्मेंद्र यांच्या पोस्टमुळे चाहत्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.
Achha to hum chalte hai……. pic.twitter.com/4GMZg0O2AP
— Dharmendra Deol (@aapkadharam) March 2, 2024
दरम्यान, अभिनेते धर्मेंद्र आजही बॉलिवूडमध्ये सक्रिय आहेत. काही वर्षांचा ब्रेक घेत धर्मेंद्र यांनी वयाच्या 88 व्या वर्षी पुन्हा दमदार कमबॅक केले आहे. धर्मेंद्र यांच्या कामाबद्दल सांगायचे तर, ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ या चित्रपटामध्ये त्यांनी मुख्य भूमिका साकारली होती.
चित्रपटातल्या धर्मेंद्र आणि शबाना यांच्या किसींग सीनमुळे त्यांना नेटकऱ्यांनी प्रचंड ट्रोल केलं होतं. तसेच ‘तेरे बातों मै ऐसा उल्झा जियाँ’ या चित्रपटामध्येही धर्मेंद्र यांनी प्रमुख भूमिका साकारली होती. लवकरच ‘अपने 2’ मध्येही ते दिसणार आहेत. धर्मेंद्र यांच्या चाहत्यांची संख्या दिवसागणिक वाढत असून त्यांच्याविषयी जाणून घेण्यासाठी चाहतेही कायमच उत्सुक असतात. । Dharmendra





