‘धर्मवीर’ला एक वर्ष पूर्ण; प्रसाद ओकेने दुसऱ्या भागाची केली घोषणा

मुंबई – अभिनेता प्रसाद ओकचा ‘धर्मवीर’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस पडला होता. धर्मवीर हा चित्रपट आनंद दिघे यांच्यावर आधारित आहे. या चित्रपटात प्रसाद ओकेने आनंद दिघे यांची भूमिका साकारली होती. त्याच्या या भूमिकेचे प्रचंड कौतुक झाले होते. या चित्रपटाच्या माध्यमातून प्रसादने एक वेगळा ठसा उमटवला होता. आज या चित्रपटाला एक वर्ष पूर्ण झाले आहेत. यानिमित्त प्रसादने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे.
प्रसादने इनस्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. मेकअप रूममधील हा व्हिडिओ असून यात प्रसाद आनंद दिघे यांचा लूक करताना दिसत आहे. याला पोस्टला कॅप्शन देत म्हटले आहे, “धर्मवीर” ‘माझ्या आयुष्यातल्या या एका अनोख्या वळणाला आज एक वर्ष पूर्ण होतंय…!! या भूमिकेनी, या चित्रपटानी मला जे काही दिलं ते शब्दांपलीकडचं आहे. दिघे साहेब असेच पाठीशी रहा!” असे लिहिले आहे.
यात त्याने प्रविण तरडे, मंगेश देसाई, मंगेश कुलकर्णी, अश्विन पाटील, सचिन नारकर, भट्टे काका, सचिन जोशी, मा. खा. श्रीकांत जी शिंदे आणि मा. मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि धर्मवीरच्या संपूर्ण टीमचे आणि रसिक प्रेक्षकांचे आभार मानले.
View this post on Instagram
विशेष म्हणजे ‘धर्मवीर’ चित्रपटाला एक वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त प्रसादने ‘धर्मवीर’ चित्रपटाच्या दुसऱ्या भागाची घोषणा केली आहे. अखेर या चित्रपटाच्या दुसऱ्या भागाची घोषणा झाल्याने चाहते देखील आतुर झाले आहेत. ‘धर्मवीर’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर मोठी कमाई केली होती.





