‘तेरे इश्क मे’च्या सेटवरील धनुषचा फोटो लीक; खास अंदाजात दिसला अभिनेता

Dhanush Look | आनंद एल राय दिग्दर्शित ‘तेरे इश्क मे’ हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. यात अभिनेता धनुष आणि अभिनेत्री क्रिती सेनन यांची जोडी पाहायला मिळणार आहे. नुकतंच सिनेमाच्या सेटवरुन धनुषचे काही फोटो लीक झाले आहेत. ज्यातील त्याचा लुक अनेकांच्या पसंतीस पडला आहे.
सोशल मीडियावर व्हायरल फोटोत वायू दलाच्या वर्दीत धनुषचा फोटो समोर आला आहे. वर्दीवर शंकर असं नाव लिहिलं आहे. यावरुन धनुष वायू दलाच्या अधिकाऱ्याच्या भूमिकेत असल्याचा अंदाज लावला जात आहे. धनुष शंकर तर क्रिती सेनन मुक्तीच्या भूमिकेत आहे. धनुषचा हा फोटो पाहून चाहत्यांची उत्सुकता आणखी वाढली आहे. Dhanush Look |
दरम्यान, धनुषची आतापर्यंतची ही सर्वात आव्हानात्मक हिंदी भूमिका असू शकते. एक असा अभिनय जो त्याच्या अभिनय क्षमता आणि भावनिक खोलीला नव्या उंचीवर घेऊन जाईल. त्याच्या गणवेशातील दमदार उपस्थिती आधीच हे संकेत देत आहे की ही भूमिका त्याच्या करिअरचा टर्निंग पॉइंट ठरू शकते. आनंद एल.राय दिग्दर्शित ‘तेरे इश्क में’ सिनेमा २८ नोव्हेंबर २०२५ ला रिलीज होणार आहे. Dhanush Look |
हेही वाचा:
मुंबई-नाशिक महामार्गावर कारमध्ये आढळले कुजलेले तीन मृतदेह; अपघात की घातपात? तपास सुरु





