Dhanush on National Awards: राष्ट्रीय पुरस्कारावरून टीका करणाऱ्यांना धनुषने दिले प्रत्युत्तर
Dhanush on National Awards: धनुषचा हा तिसरा राष्ट्रीय पुरस्कार

Dhanush on National Awards: अलिकडेच ७२ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. यामध्ये दाक्षिणात्य अभिनेता धनुषने दोन राष्ट्रीय पुरस्कार आपल्या नावावर केले. हे पुरस्कार त्याला ‘रायन’ आणि ‘कॅप्टन मिलर’ यांसारख्या चित्रपटांसाठी जाहीर करण्यात आले. मात्र हा पुरस्कार जाहीर होताच धनुषला सोशल मीडियावर ट्रोल करण्यात आले. यावर आता धनुषने टीका करणाऱ्यांना सडेतोड उत्तर दिले आहे.
धनुषने दिग्दर्शित केलेल्या ‘रायन’ या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट प्रादेशिक चित्रपटाचा (सर्वोत्कृष्ट तमिळ चित्रपट) राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. दिग्दर्शक म्हणून धनुषचा हा पहिलाच राष्ट्रीय पुरस्कार आहे. तर ‘कॅप्टन मिलर’ या चित्रपटातील उत्कृष्ट अभिनयासाठी धनुषला ‘सर्वोत्कृष्ट अभिनेता’ श्रेणीत विशेष उल्लेखाचा बहुमान मिळाला आहे. ( Dhanush on National Awards)
परंतु अनेकांचे म्हणणे होते की, तो या पुरस्कारांसाठी योग्य नव्हता. तर विजय सेतुपतीचा ‘महाराजा’ आणि कार्तीचा ‘मेय्याझगन’ हे चित्रपट या पुरस्कारासाठी अधिक पात्र होते, असे अनेकांचे म्हणणे होते. आता यावर आपली भूमिका मांडत धनुषने टीकाकारांना चोख प्रत्युत्तर दिले आहे.
धनुष नेमकं काय म्हणाला? (Dhanush on National Awards)
राष्ट्रीय पुरस्कार जिंकल्याबद्दल ट्रोल होण्याबाबत धनुष म्हणाला की, “मला ‘रायन’साठी राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. यात काही शंका नाही की स्पर्धेत त्यापेक्षा चांगले चित्रपट होते. त्या चित्रपटांच्या चाहत्यांनी त्यांचं प्रेम व्यक्त केलं आणि मी त्यांच्या भावनांचा पूर्ण आदर करतो. पण ९० टक्के लोक मला पुरस्कार मिळाल्याच्या विरोधात आहेत.”
धनुषने ‘अधु ओरू काना काळम’ आणि ‘पुधुपेट्टाई’ यांसारख्या चित्रपटांबद्दल म्हटले की, “लोकांनी भाकीत केलं होतं की त्याला या चित्रपटांसाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळेल, पण तसं झालं नाही. अनेकदा तुम्ही कितीही प्रयत्न केले तरी, काही गोष्टी आपोआप जुळून येतात आणि माझ्या बाबतीतही नेमकं तेच घडलं. माझे प्रयत्न प्रामाणिक होते. मी दोन राष्ट्रीय पुरस्कार मिळवले, त्याचा आनंद आहे.” (Dhanush on National Awards)
दरम्यान, अभिनेता म्हणून धनुषचा हा तिसरा राष्ट्रीय पुरस्कार ठरला आहे. यापूर्वी त्याला ‘आडुकलम’ या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता.’असुरन’ या चित्रपटातील उत्कृष्ट भूमिकेसाठी ६७ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला होता.
दरम्यान, २०२४ मध्ये आलेला त्याचा ‘रायन’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरला होता. सॅकनिल्कच्या रिपोर्टनुसार, या चित्रपटाने जगभरात १६० कोटी रुपयांचे कलेक्शन केले होते.
हेही वाचा:
Scuba Diving : टीव्हीवरील लोकप्रिय कपलचा रोमॅंटिक अंदाज; अनोख्या पद्धतीने गर्लफ्रेंडला केलं प्रपोज






