धनुष आणि क्रिती पोहचले वाराणसीत; गंगा आरतीचे व्हिडिओ व्हायरल

Dhanush and Kriti Sanon | अभिनेत्री क्रिती सेनन आणि धनुष ‘तेरे इश्क मे’च्या प्रमोशनसाठी वाराणसीत पोहचले होते. तेथील त्यांचे फोटो व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. दोघांची केमिस्ट्री जबरदस्त दिसत आहे. त्यांचा नवीन चित्रपट ‘तेरे इश्क में’ २८ नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होत आहे.
हा चित्रपट हिंदी, तमिळ आणि तेलुगू या तीन भाषांमध्ये एकाच वेळी प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाचा ट्रेलर आयपी मॉलमध्ये लॉन्च करण्यात आला, ज्यात निर्माते आनंद एल. राय उपस्थित होते.
यावेळी धनुष आणि आनंद एल राय यांच्याच गाजेलल्या ‘रांझणा’ सिनेमाचीच आठवण चाहत्यांना आली आहे. वाराणसी आणि रांझणा सिनेमाचं जसं कनेक्शन होतं तसंच या सिनेमाचं देखील आहे. त्यासाठी आनंद एल राय यांच्यासह धनुष आणि क्रिती वाराणसीला आले होते. Dhanush and Kriti Sanon |
View this post on Instagram
धनुष व्हाईट आऊटफिटमध्ये नेहमीप्रमाणेच हँडसम दिसत आहे. त्याच्या गळ्यात रुद्राक्षाची माळ आहे. तर क्रितीने बिस्कीट कलरचा सुंदर ड्रेस आणि हिरवी ओढणी घेतली आहे.या लूकमध्ये क्रितीचं सौंदर्य खुललं आहे. वाराणसीमध्ये गंगा नदीच्या किनारी ते बसले आहेत. मागे सुंदर नदीचं दृश्य आहे. तर रात्री गंगा आरतीमध्येही दोघांनी सहभाग घेतला आहे. त्यांचे फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
या चित्रपटाच्या निमित्ताने ते प्रेक्षकांसमोर एक नवीन प्रेमकहाणी सादर करण्यासाठी सज्ज झाले आहेत. ‘तेरे इश्क में’ ही एक प्रेमकहाणी आहे, जी शंकर आणि मुक्ती या विषयावर आधारित आहे. ही कथा तर्क, वेळ आणि नशीब यांना आव्हान देते. तर या सिनेमासाठी संगीत दिग्दर्शन ए आर रहमानने केलं आहे. Dhanush and Kriti Sanon |
हेही वाचा:
शरद पवार गटाच्या नेत्यावर जीवघेणा हल्ला; ऐन निवडणुकीच्या रणधुमाळीत हल्ला झाल्याने एकच खळबळ




