धानोरी : माता जिजाऊ प्रतिष्ठान आयोजित रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

Updated On:

विश्रांतवाडी : “रक्तदान हेच जीवनदान, रक्तदान हेच सर्वश्रेष्ठ दान” या संकल्पनेतून धानोरीतील माता जिजाऊ प्रतिष्ठान, रोटरी क्लब ऑफ डिजिटल आणि रेड प्लस ब्लड बँक यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी(दि.१३) रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. धानोरी मुख्य रस्त्यावरील आनंद मंगल कार्यालयात संपन्न झालेल्या शिबिरात सामाजिक कर्तव्याची जाणीव ठेवत ८५७ जणांनी रक्तदान करून मोलाचं योगदान दिल्याचे कार्यक्रमाचे मुख्य संयोजक नगरसेवक तथा प्रतिष्ठानचे संस्थापक अनिल (बॉबी) टिंगरे यांनी सांगितले.

प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक उद्योजक सुरेश पाटील यांच्या हस्ते राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी नगरसेविका ऐश्वर्या जाधव, डॉ. व्ही. भुजाडी, लायन्स क्लबचे ऍड. घनश्याम खलाटे, ब्लड बँकेचे डॉ. यशवंत शिंदे, मोहनराव शिंदे-सरकार, बाबुराव टिंगरे, बाळासाहेब टिंगरे, विकास टिंगरे, सचीन टिंगरे, विशाल टिंगरे, भरत टिंगरे, माऊली टिंगरे, प्रदीप (डॉली) टिंगरे, अतुल टिंगरे, अतुल परांडे, योगेश टिंगरे, धनंजय टिंगरे, सुयश टिंगरे, सागर म्हस्के, आशुतोष जाधव, जगदीश देशपांडे, सुभाष पाटील, कैलास भारती, धनंजय जाधव, सुधीर सरवदे, मनोज अगरवाल, अविनाश सकुंडे, राहुल जाधव, दिलीप डाळींबकर, गोपाळ पाटील, शशी खलसे, जयंत नंबियार, भीमराव गोळे यांसह प्रभाग क्रमांक एक मधील विविध सोसायट्यांचे अध्यक्ष, सामाजिक मंडळांचे पदाधिकारी व नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.

रक्तदान शिबिराचे आयोजन नगरसेवक अनिल टिंगरे व सामाजिक कार्यकर्ते विशाल टिंगरे यांनी केले होते. सकाळी साडे आठ वाजल्यापासूनच रक्तदान करण्यासाठी रक्तदात्यांनी रांगा लावल्या होत्या. रक्तदान करण्यासाठी महिलांची उपस्थिती लक्षणीय होती. परंतु रक्तामध्ये हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी असल्यामुळे बहुतांश महिलांना रक्तदान करता आले नाही. तसेच प्रचंड गर्दीमुळे अनेकजण रक्तदान करण्यासाठी प्रतीक्षा (वेटींग) करावी लागत असल्याचे पाहून रक्तदान न करताच निघून गेले. प्रत्येक रक्तदात्याला प्रमाणपत्र व भेटवस्तू देण्यात आली.

अनलॉकनंतर रुग्णालयात विविध शस्त्रक्रिया होऊ लागल्या आहेत. परंतु करोनामुळे रक्तसाठा कमी झाला आहे. याचा परिणाम शस्त्रक्रियांवर होत आहे. याच पार्श्वभूमीवर आरोग्य प्रशासनाच्या आवाहनानुसार व तरुणाईमध्ये रक्तदानाचे महत्त्व रुजवून त्यांना रक्तदानासाठी प्रेरित करण्यासाठी प्रतिष्ठाणच्यावतीने शिबिर आयोजित करण्यात आले. या शिबिराला ज्येष्ठ नागरिक, युवक, युवती यांच्यासह महिलाभगिनींनी चांगला प्रतिसाद दिला. सर्वांनी सामाजिक कर्तव्याची जाण ठेवून रक्तदान करत सहकार्य केले. तसेच हे रक्तदान शिबीर सफल करण्यासाठी प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी केलेले मोलाचं कार्य सार्थकी लागल्याची भावना नगरसेवक अनिल(बॉबी) टिंगरे यांनी व्यक्त केली.

राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रविंद्रआण्णा माळवदकर यांनी भेट देऊन शिबिराचे उत्कृष्ट नियोजन केल्याबद्दल कौतुक केले. तसेच पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. राजीव कुलकर्णी व शैलेश रणनवरे यांनी सूत्रसंचालन केले. तर प्रतिष्ठानचे अध्यक्ष बिपिन पोळ यांनी आभार मानले. शिबिर यशस्वी करण्यासाठी प्रतिष्ठाणचे प्रकाश सुतार, नीळकंठ गाडवे, विकास साळुंखे, काशिनाथ जाधव, गुरुनाथ बिराजदार, महेश सगरे, आकाश दरेकर, विवेक पाटील, योगेश निरभुवणे, सिद्धार्थ तरकसे, राहुल जाधव, गणेश गवळी, अभय मोरे यांसह प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले.

आणखी संबंधित बातम्या

Chatro Ki Gunj: 'मन की बात' सांगणारा नव्हे, आमची समस्या ऐकणारा हवा  

2026-08-23 08:01:35

Chatro Ki Gunj: 'मन की बात' सांगणारा नव्हे, आमची समस्या ऐकणारा हवा  

pune : पुणे विद्यापीठात वंदे मातरम् चा जयघोष

2026-08-23 07:33:51

pune : पुणे विद्यापीठात वंदे मातरम् चा जयघोष

Pune : ‘वंदे मातरम्’च्या सामूहिक गायनाने पुणे विद्यापीठ परिसर दुमदुमला; युवाशक्तीचा देशभक्तीचा हुंकार

2026-08-22 22:59:41

Pune : ‘वंदे मातरम्’च्या सामूहिक गायनाने पुणे विद्यापीठ परिसर दुमदुमला; युवाशक्तीचा देशभक्तीचा हुंकार

Chhatron Ki Goonj Pune : तरुणीने स्टेजवर जे सांगितलं ते ऐकून राहुल गांधी स्तब्ध; पुण्यात ‘छात्रों की गूंज’ कार्यक्रमात विद्यार्थिनींशी संवाद

2026-08-22 21:42:18

Chhatron Ki Goonj Pune : तरुणीने स्टेजवर जे सांगितलं ते ऐकून राहुल गांधी स्तब्ध; पुण्यात ‘छात्रों की गूंज’ कार्यक्रमात विद्यार्थिनींशी संवाद

Rahul Gandhi : पुण्यात आदिवासी विद्यार्थ्यांच्या सुरु असलेल्या उपोषणाला राहुल गांधी भेट देणार? विद्यार्थिनीने मांडली व्यथा

2026-08-22 20:33:14

Rahul Gandhi : पुण्यात आदिवासी विद्यार्थ्यांच्या सुरु असलेल्या उपोषणाला राहुल गांधी भेट देणार? विद्यार्थिनीने मांडली व्यथा