Dhanatrayodashi: धन्वंतरी पूजनाने धनत्रयोदशी साजरी
Dhanatrayodashi:

Dhanatrayodashi: उत्तम आरोग्य रहावे यासाठी देवांचे वैद्य धन्वंतरी यांच्या पूजनाने आणि यमदीपदानाने शुक्रवारी दिवाळीचा दुसरा दिवस साजरा झाला.
आश्विन कृष्ण त्रयोदशी म्हणजेच धनत्रयोदशी! धन्वंतरी पूजनासह घरातील अलंकार, धणे, सोने – नाणे स्वच्छ केले जाते. विष्णू, लक्ष्मी, कुबेर, योगिनी, गणेश, नाग, द्रव्यनिधीची पूजा करण्यात आली.
हिंदू परंपरेनुसार आरोग्याची देवता धन्वंतरी, समुद्र मंथनावेळी प्रकट झाली. धन्वंतरी विष्णूचा अवतारही मानला जातो. यामागे अनेक काल्पनिक कथा आहेत. हेमराजाच्या पुत्राच्या पत्नीने आपल्या पतीचा अपमृत्यू टाळला आणि सर्परूपात आलेल्या यमराजाला पुन्हा पाठवले.
अशा प्रकारे तिने राजकुमाराचे प्राण वाचवले. म्हणूनच या दिवसास यमदीपदान असेही म्हणतात. या दिवशी सायंकाळी घराबाहेर दिवा लावून त्याच्या वातीचे टोक दक्षिणेसकरून यमाचे तर्पण केले. राजकुमाराप्रमाणेच याने अपमृत्यू टळतो असा समज आहे.





