धनंजय मुंडेंच्या अडचणीत वाढ; सुरेश धस ‘त्या’ प्रकरणी ईडीकडे करणार तक्रार

Suresh Dhas on Dhananjay Munde | मस्साजोगचे दिवंगत सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याच्या मागणीने जोर धरला होता. मात्र संतोष देशमुख यांच्या हत्येचे हादरवून टाकणारे फोटो समोर आल्यानंतर ४ मार्चला मुंडेंनी अन्न व नागरी पुरवठा मंत्री पदाचा राजीनामा दिला. त्यानंतरही धनंजय मुंडे यांच्या अडचणी कमी झालेल्या नाही. कृषी विभागातील कथित घोटाळ्याच्या आरोपांनंतर सुरेश धस थेट ईडीला पत्र लिहून तक्रार दाखल करणार असल्याची माहिती समोर आली आहे.
सुरेश धस यांनी तत्कालीन कृषीमंत्री धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांनी कृषी विभागातील तब्बल २०० कोटी रूपये परस्पर उचलली होती, असा आरोप काही दिवसांपूर्वी केला होता. सामाजिक कार्यकर्ता अंजली दमानिया यांनी देखील पुराव्यानिशी कृषी घोटाळाप्रकरणी मुंडेंवर आरोप केले होते. त्यामुळे कृषी विभागातील कथित घोटाळाप्रकरणी धनंजय मुंडे यांच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.
अंजली दमानियांनी केले धनंजय मुंडेंवर आरोप
दरम्यान, सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी देखील धनंजय मुंडे यांच्यावर कृषीमंत्री असताना जवळपास 245 कोटी रुपयांचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप केला होता. राज्यातील सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना बळकटी देण्यासाठी सरकारने योजना सुरू केली होती. या योजनेअंतर्गत कापूस गोळा करण्याच्या बॅग, नॅनो युरिया, नॅनो डीओबी, फवारणी पंप अशा वस्तूंची खरेदी करण्यात आली. मात्र या वस्तूंची खरेदी बाजारभावापेक्षा महाग करण्यात आल्याचा आरोप मुंडेंवर करण्यात आला होता. Suresh Dhas on Dhananjay Munde |
धनंजय मुंडे यांच्या काळातील या भ्रष्टाचाराची एसआयटी स्थापन करून चौकशी करा, अशी मागणी देखील सुरेश धस यांनी केली आहे. याच प्रकरणातील कृषी विभागातील घोटाळ्याची सुरेश धस ईडीकडे तक्रार करणार असल्याने धनंजय मुंडे यांच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. Suresh Dhas on Dhananjay Munde |
हेही वाचा :
भयनाक! जगप्रसिद्ध पर्यटन स्थळी इस्रायलच्या महिलेवर सामुहिक बलात्कार, इतरांना तलावात फेकले





