Madhuri Dixit : बॉलीवूडची ‘धकधक गर्ल’ अभिनेत्री माधुरी दीक्षितच्या लग्नाला २६ वर्षे पूर्ण झाली आहेत. यानिमित्त तिने सोशल मिडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये त्यांच्या लग्नाचे काही सुंदर फोटो पाहायला मिळत आहेत, तर विविध ठिकाणी फिरायला गेलेले असताना काढलेले काही फोटो पाहायला मिळत आहेत. दोघांच्याही आयुष्यातील विविध टप्प्यावरील काढलेले फोटो माधुरीने शेअर केलेले पोस्टमध्ये दिसत आहेत. माधुरी व श्रीराम नेने यांच्यातील काही सुंदर क्षण पाहायला मिळत आहेत. यामध्ये ‘तू हैं तो’ हे गाणे ऐकायला मिळत आहे. हे फोटो शेअर करताना माधुरी दीक्षितने लिहिले, “क्षणांपासून ते आठवणींपर्यंत, गेली २६ वर्षे एकत्र आयुष्य जगत आहोत. हॅपी अॅनिव्हर्सरी”, असे लिहित तिने तिचे पती डॉक्टर नेनेंना टॅग केले. याद्वारे तिने जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे माधुरी दीक्षित आणि डॉ. श्रीराम नेने यांनी १९९९ ला लग्नगाठ बांधली. त्यांना दोन मुले आहेत. लग्नानंतर माधुरी पतीबरोबर अमेरिकेत गेली होती. अभिनयातून तिने काही काळ ब्रेक घेतला होता. मात्र, आता ती कुटुंबासह भारतात परतली असून गेल्या काही वर्षांमध्ये तिने पुन्हा काम करण्यास सुरुवात केली आहे. माधुरीला १९८८ साली प्रदर्शित झालेल्या तेजाब चित्रपटातून अभिनेत्रीला मोठी लोकप्रियता मिळाली. ‘देवदास’, ‘दिल तो पागल हैं’, ‘आजा नचले’, ‘खलनायक’, ‘दिल’, ‘परिंदा’, ‘लज्जा’, ‘हम आपके है कोन’, ‘बेटा’, असे अनेक चित्रपट गाजले. अभिनेत्रीला जितकी तिच्या अभिनय आणि सौंदर्यामुळे ओळख मिळाली, तितकीच तिच्या नृत्यामुळेदेखील माधुरी लोकप्रिय ठरली.