DGP Death : मोठी बातमी..! पोलीस महासंचालकांचा मृत्यू; राज्यात खळबळ, पोलीस मुख्यालयातच आढळला मृतदेह
DGP Death : देशाच्या सुरक्षा आणि पोलीस प्रशासनाला हादरवून टाकणारी एक अत्यंत मोठी आणि धक्कादायक बातमी समोर आली आहे.

DGP Death : त्रिपुराचे पोलीस महासंचालक (DGP) अनुराग धनखड यांचा सोमवारी संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाल्याने राज्यात खळबळ उडाली आहे. त्यांचा मृतदेह अगरतळा येथील राज्य पोलीस मुख्यालयातील कार्यालयात आढळून आला. (DGP Death)
या घटनेनंतर वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि प्रशासनाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली असून मृत्यूचे नेमके कारण शोधण्यासाठी सखोल चौकशी सुरू करण्यात आली आहे. (DGP Death)
प्राथमिक माहितीनुसार, अनुराग धनखड यांना तातडीने गोविंद बल्लभ पंत (जी.बी.) रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. काही माध्यमांच्या वृत्तांमध्ये आत्महत्येची शक्यता व्यक्त करण्यात आली असली, तरी अधिकृतपणे मृत्यूचे कारण जाहीर करण्यात आलेले नाही. (DGP Death)
घटनेनंतर पोलीस मुख्यालयाचा परिसर सुरक्षा कवचाखाली घेण्यात आला असून फॉरेन्सिक पथकाने घटनास्थळावरील पुरावे गोळा करण्यास सुरुवात केली आहे. सर्व शक्यतांचा तपास केला जात असून अधिकृत अहवालानंतरच मृत्यूमागील कारण स्पष्ट होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. (DGP Death)
या घटनेची माहिती मिळताच त्रिपुराचे मुख्यमंत्री माणिक साहा यांनी तातडीने रुग्णालयाला भेट दिली. त्यांच्यासोबत मुख्य सचिव जे. के. सिन्हा आणि गृह विभागातील वरिष्ठ अधिकारीही उपस्थित होते. (DGP Death)

अनुराग धनखड कोण होते?
अनुराग धनखड हे 1994 बॅचचे IPS अधिकारी होते. त्यांनी 2025 मध्ये त्रिपुराचे पोलीस महासंचालक म्हणून पदभार स्वीकारला होता. यापूर्वी केंद्रीय अन्वेषण विभाग (CBI) मध्ये कार्यरत असताना त्यांनी नीरव मोदी प्रकरणाच्या तपासात महत्त्वाची भूमिका बजावली होती. तसेच 1984 च्या शीखविरोधी दंगलींच्या तपासासाठी स्थापन करण्यात आलेल्या विशेष तपास पथकाचे (SIT) नेतृत्वही त्यांनी केले होते. (DGP Death)





