Dewald Brevis : IPL 2025 च्या मध्यात CSK चा मास्टर स्ट्रोक! मुंबईच्या माजी खेळाडूला संघात केले सामील

Dewald Brevis joins CSK as Gurjapneet Singh’s replacement in IPL 2025 : आयपीएल २०२५ च्या मध्यात चेन्नई संघाने मास्टरस्ट्रोक खेळला आहे. संघात एका नवीन खेळाडूचा समावेश झाला आहे. लवकरच तो त्याच्या संघाकडून खेळताना दिसेल. आपण डेवॉल्ड ब्रेव्हिसबद्दल बोलत आहोत. जो यापूर्वी आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळला होता, पण यावेळी तो अनसोल्ड राहिला होता, पण आता सीएसकेने त्याला संधी देण्याचा विचार केला आहे. यामुळे संघ आणखी मजबूत होईल. डेवाल्ड ब्रेव्हिस हा त्याच्या स्फोटक फलंदाजीसाठी ओळखला जातो.
गुर्जपनीत सिंगच्या जागी डेवाल्ड ब्रेव्हिसला संधी-
सीएसकेने अलीकडेच सोशल मीडियावर सांगितले होते गुर्जपनीत सिंग दुखापतीमुळे या हंगामात आयपीएलमधून बाहेर पडला आहे. आम्ही त्याच्या लवकर बरे होण्याच्या शुभेच्छा देतो. यानंतर काही वेळातच, संघाने कळवले की त्याच्या जागी डेवाल्ड ब्रेव्हिसने संघात स्थान मिळवले आहे. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की एका भारतीय खेळाडूच्या जागी एक परदेशी खेळाडू कसा आला?
🚨 NEWS 🚨
Chennai Super Kings sign Dewald Brevis as a replacement for the injured Gurjapneet Singh.
Details 🔽 #TATAIPL | @ChennaiIPL https://t.co/0iToHNpVf8 pic.twitter.com/Gto18BfzII
— IndianPremierLeague (@IPL) April 18, 2025
गुर्जपनीत सिंग भारतीय आहे. पण जेव्हा लिलाव झाला तेव्हा चेन्नई संघाने आपल्या संघात फक्त सात परदेशी खेळाडूंचा समावेश केला होता. बीसीसीआयच्या नियमांनुसार, कोणताही संघ आठ परदेशी खेळाडूंना आपल्या संघात ठेवू शकतो. याचा अर्थ असा की चेन्नईमध्ये एक परदेशी खेळाडूची जागा रिक्त होती, जिथे संघाने डेवाल्ड ब्रेव्हिसचा समावेश केला आहे.
हेही वाचा – MI vs SRH : मुंबईने हैदराबादला पाणी पाजत नोंदवला सलग दुसरा विजय, हार्दिक-जॅक्सने बजावली महत्त्वाची भूमिका
डेवाल्ड ब्रेव्हिस मुंबईकडून खेळलाय आयपीएल –
मूळचा दक्षिण आफ्रिकेचा रहिवासी असलेला डेवाल्ड ब्रेव्हिसची तुलना एबी डिव्हिलियर्सशी केली जाते. याआधी तो मुंबई इंडियन्सकडून आयपीएल खेळला आहे. तो आयपीएल २०२२ आणि २०२४ मध्ये मुंबई इंडियन्सचा भाग होता. या काळात त्याने या संघासाठी १० सामने खेळले आहेत आणि २३० धावा केल्या आहेत. त्याची सरासरी २३ आहे आणि तो १३३.७२ च्या स्ट्राईक रेटने फलंदाजी करतो. तथापि, त्याला आयपीएलमध्ये या संघाकडून खेळण्याची फार कमी संधी मिळाली.





