Dewald Brevis : ब्रेव्हिसचा जलवा! ऑस्ट्रेलियाविरुद्ध षटकारांचा पाऊस पाडत मोडला कोहलीचा खास विक्रम

Dewald Brevis Break Virat Kohli’s Record : ऑस्ट्रेलियाने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेत २-१ अशा फरकाने विजय मिळवला. मालिकेतील अंतिम आणि तिसऱ्या टी-२० सामन्यात केर्न्स येथे ऑस्ट्रेलियाने दक्षिण आफ्रिकेचा २ गडी राखून पराभव केला. या सामनन्यात ग्लेन मॅक्सवेलच्या खेळीने डेवॉल्ड ब्रेव्हिसच्या वादळी खेळीवर पाणी फेरले. पण ब्रेव्हिसने या खेळीच्या जोरावर सर्वांचे लक्ष वेधून घेताना किंग कोहलीचा एक खास विक्रम मोडला.
दक्षिण आफ्रिकेचा पराभव, पण ब्रेव्हिसची वादळी खेळी –
तिसऱ्या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना दक्षिण आफ्रिकेने २० षटकांत ७ बाद १७२ धावा केल्या. युवा फलंदाज डेवॉल्ड ब्रेव्हिसने २६ चेंडूंमध्ये ५३ धावांची विस्फोटक खेळी केली, ज्यात ६ षटकार आणि १ चौकाराचा समावेश होता. मालिकेतील यापूर्वीच्या दोन सामन्यांमध्येही ब्रेव्हिसने शानदार फलंदाजी केली होती. या मालिकेत त्याने एकूण १४ षटकार ठोकले. या दरम्यान त्या विराट कोहलीचा एक विक्रम मोडला.
ब्रेव्हिसने मोडला विराट कोहलीचा विक्रम –
NO LOOK SIX.
NO LOOK SIX.
NO LOOK SIX.Dewald Brevis smashed 3 consecutive sixes, all of them no look. 🥶pic.twitter.com/soj1mDNmkO
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) August 16, 2025
या मालिकेतील दमदार कामगिरीसह डेवॉल्ड ब्रेव्हिसने भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीचा एक खास विक्रम मोडला. ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी-२० मालिकेत सर्वाधिक षटकार ठोकण्याचा विक्रम आता ब्रेव्हिसच्या नावावर आहे. यापूर्वी हा विक्रम विराट कोहलीच्या नावावर होता, ज्याने १० डावांत १२ षटकार लगावले होते. ब्रेव्हिसने मात्र केवळ तीन सामन्यांत १४ षटकार ठोकत हा विक्रम आपल्या नावावर केला.
ऑस्ट्रेलियाचा रोमांचक विजय-
दक्षिण आफ्रिकेने दिलेल्या १७३ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाने १९.५ षटकांत ५ बाद १७३ धावा करत सामना जिंकला. ऑस्ट्रेलियाकडून अष्टपैलू खेळाडू ग्लेन मॅक्सवेलने ३६ चेंडूंमध्ये नाबाद ६२ धावांची खेळी केली, ज्यात ८ चौकार आणि २ षटकारांचा समावेश होता. त्याच्या या निर्णायक खेळीमुळे त्याला सामनावीराचा पुरस्कार मिळाला.





