Devoleena Bhattacharjee : गोपी बहूच्या घरी चिमुकल्याचे आगमन; अभिनेत्री देवोलिनाने दिला गोंडस मुलाला जन्म

Devoleena Bhattacharjee : अभिनेत्री देवोलीना भट्टाचार्जीला ‘गोपी बहू’ या नावाने मोठी ओळख मिळाली. देवोलीना आता आई झाली आहे. काही दिवसांपूर्वीच तिने मॅटर्निटी फोटोशूट केले होते. ज्याचे फोटो अभिनेत्रीने सोशल मीडियावर सुद्धा शेअर केले होते. देवोलीना भट्टाचार्जीने पती शाहनवाज याच्यासोबत हे फोटोशूट केले आहे. या फोटोंमध्ये देवोलिना खूपच सुंदर दिसत होती.
सध्या तिच्या घरी छोट्या पाहुण्याचं आगमन झालं आहे. लाडक्या गोपी बहूने मुलाला जन्म दिला आहे. स्वतः देवोलीना आणि शाहनवाज यांनी सोशल मीडियावर त्यांच्या चाहत्यांसोबत ही गोड बातमी शेअर केली आहे. नेटकरी त्यांच्या पोस्टवर कमेंट वरून या जोडप्याला शुभेच्छा आणि आशीर्वाद देत आहेत.
देवोलीना म्हणते “आम्ही आमचा हा छोटासा आनंद व्यक्त करण्यासाठी खूप उत्सुक आहोत. आमचा मुलगा या जगात आला आहे. 18.12.2024 ” अशी तारीखही अभिनेत्रीने त्या पोस्टमध्ये नमूद केली आहे. देवोलीना आणि शहनाज यांनी काल मुलाचे स्वागत केले, परंतु एका दिवसानंतर, अर्थात आज त्यांनी ही गुड न्यूज चाहत्यांशी शेअर केली.
View this post on Instagram
काही दिवसांपूर्वीच देवोलीनाचा बेबी शॉवर सोहळा पार पडला होता. तेव्हा पासूनच फॅन्स या दिवसाची आनंदाने वाट पाहत होते. अभिनेत्री देवोलीनाने 2022 मध्ये शाहनवाजसोबत लग्न केले, जो तिचा जिम ट्रेनर होता. देवोलिना हिंदू तर शाहनवाज हा मुस्लिम असून दोघांनी कोर्ट मॅरेज केलं आहे. त्यांच्या लग्नानंतर अभिनेत्रीला ट्रोलिंगचा देखील सामना करावा लागला होता.
देवोलीनाचा जन्म 22 ऑगस्ट 1985 रोजी आसाममध्ये झाला. भट्टाचार्जी कुटुंब मूळचं बंगाली आहे. तिचं लहानपण दिल्लीतील गुरुग्राममध्ये गेलं. तिचं शिक्षण आसाम मधून झालं. देवोलीनाने ‘डान्स इंडिया डान्स 2’ मध्ये सहभाग घेतला. सावरें सबके सपने प्रीतों या कार्यक्रमात दिसली. नंतर तिने केली साथ निभाना साथिया ही लोकप्रिय मालिका ज्यातून तिला प्रसिद्धी मिळाली.





