Devendra Fadnavis : कृष्णाखोरे, कोकणातील पाणी मराठवाड्यात आणणार; मुख्यमंत्री फडणवीस यांची घोषणा
मराठवाड्याचा आधी स्वातंत्र्यासाठी संघर्ष झाला आता दुष्काळाशी संघर्ष सुरु आहे. आताही पावसाने ओढ दिल्याने शेतकरी (Devendra Fadnavis) चिंतेत आहे. या परिस्थितीत शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहे.

Devendra Fadnavis : मराठवाड्याचा आधी स्वातंत्र्यासाठी संघर्ष झाला आता दुष्काळाशी संघर्ष सुरु आहे. आताही पावसाने ओढ दिल्याने शेतकरी (Devendra Fadnavis) चिंतेत आहे. या परिस्थितीत शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहे.
ही परिस्थिती बदलवण्यासाठी कोकणातील आणि कृष्णाखोऱ्यातील वाहून जाणारे पाणी आपण मराठवाड्यात आणून मराठवाडा दुष्काळमुक्त करु, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त मुख्यमंत्री (Devendra Fadnavis) एका शासकीय सोहळ्यास उपस्थित होते.
शहीद स्मारकास मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते पुष्पचक्र अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. उपस्थित सर्व मान्यवरांनीही पुष्पचक्र अर्पण करुन अभिवादन केले. मुख्यमंत्री फडणवीस यांनी उपस्थितांना संबोधित केले.
मुख्यमंत्री म्हणाले, अनेकांच्या बलिदानामुळेच खऱ्या अर्थाने मराठवाडा मुक्त झाला आहे. त्यावेळी लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांनी एक प्रचंड मोठी लढाई उभारली त्यातून आपला मराठवाडा मुक्त झाला. त्यावेळी अत्याचाराची परिसिमा झाली होती. अशा प्रकारच्या अवस्थेतून या मराठवाड्याला बाहेर काढण्याचे काम हे आपल्या स्वातंत्र्यसंग्रामसेनानींनी केले. त्यांच्याप्रती आपली कृतज्ञता त्यांनी व्यक्त केली.
मराठवाड्याच्या दुष्काळीस्थितीबाबत मुख्यमंत्री (Devendra Fadnavis) म्हणाले की, मराठवाड्याच्या या पिढीने दुष्काळ पाहिला; पण पुढच्या पिढीला आपल्याला दुष्काळ पाहू द्यायचा नाही हा संकल्प आम्ही केला आहे. आणि त्या दृष्टीने अतिशय वेगाने वाटचाल सुरु आहे. कृष्णा खोऱ्यातील पाणी भीमा खोऱ्यातून अतिरिक्त ३० टीएमसी पाणी मराठवाड्यामध्ये आणायचे काम आता सुरू करत आहोत.
यामुळे धाराशिव, बीड आणि लातूरच्या भागापर्यंत पाणी आणता येईल. तसेच गोदावरीच्या खोऱ्यामध्ये उल्हास खोऱ्यातून, कोकणातून पाणी उचलून आणि नदीजोड प्रकल्पाच्या माध्यमातून आणण्याचा प्रकल्प अहवाल तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यामध्ये पोहोचले आहे. अंदाज असा आहे की, जवळपास ७० टीएमसी पाणी उल्हास खोऱ्यातून हे गोदावरीच्या खोऱ्यात आपल्याला आणता येईल आणि आपला मराठवाडा कायमचा दुष्काळमुक्त होईल. टप्प्याटप्प्याने सात वर्षात हे काम पूर्ण होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
पंचनाम्यांची प्रक्रिया ५ ऑक्टोबरनंतर
मराठवाडा सातत्याने संघर्ष करतोय. विकासाचा संघर्ष गेल्या अनेक वर्षांपासून सुरु आहे. दुष्काळाचे संकट हे सातत्याने घोंगावताना दिसते. यंदाचे वर्ष देखील दुष्काळाचे वर्ष आहे. पावसाचा मोठा खंड पडला आणि मोठ्या प्रमाणात शेतीचे, पिकांचे नुकसान झाले. आमचा शेतकरी चिंतेत आहे. कुठल्याही परिस्थितीमध्ये सरकार पूर्णपणे शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहील, शेतकऱ्यांना सगळ्या प्रकारची मदत आपण देऊ. पंचनाम्यांची प्रक्रिया ५ ऑक्टोबरनंतर पूर्ण करुन आम्ही शेतकऱ्यांना मदत करु. पिण्याचे पाणी, चारा अशी सगळी व्यवस्था आणि नियोजन केले आहे.






