देवेंद्र फडणवीसांनी राज ठाकरे यांच्या भेटीमागचं सांगितलं कारण; म्हणाले “राजकीय भेट नव्हती…”

Devendra Fadnvis | मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची ‘शिवतीर्थ’ या निवासस्थानी भेट घेतली. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या दृष्टीने ही भेट झाल्याची चर्चा रंगली आहे. या दोन प्रमुख नेत्यांची सुमारे तासभर बंद दाराआड चर्चा सुरू होती. मात्र आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या भेटीमागचं कारण सांगितले आहे. ही राजकीय भेट नसल्याचे फडणविसांनी स्पष्ट केले आहे.
देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
राज ठाकरे यांची भेट घेतल्याबद्दल विचारलेल्या प्रश्नावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “ही कुठलीही राजकीय भेट नव्हती, मी मुख्यमंत्री झाल्यानंतर राज ठाकरे यांचा अभिनंदनाचा फोन आला, तेव्हा मी त्यांना सांगितलं होतं की मी घरी येईन. त्याप्रमाणे मी घरी गेलो होते. ब्रेकफास्ट केला गप्पा मारल्या. या बैठकीचा कुठलाही राजकीय संदर्भ नाही. केवळ मैत्रीकरिता मी त्यांच्या घरी गेलो होते.” Devendra Fadnvis |
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीचा ऐतिहासिक विजय झाला. या विजयावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी संशय व्यक्त केला होता. त्यानतंर मनसे-महायुतीच्या नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपांचे राजकारण सुरू झाले. यादरम्यान आज सकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी आज शिवतीर्थावर जाऊन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाल्या होत्या. Devendra Fadnvis |
अमित ठाकरेंना विधानपरिषदेवर पाठवणार?
तर दुसरीकडे, भाजपच्या कोट्यातून राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांना विधानपरिषदेवर पाठवण्यात येणार असल्याचे बोललं जात आहे. सध्या राज्यपाल नियुक्त आमदारांच्या एकूण 12 जागांपैकी 5 जागा रिक्त आहेत. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत अमित ठाकरे यांचा पराभव झाला होता. यानंतर आता भाजपच्या कोट्यातून अमित ठाकरे यांना विधानपरिषदेवर पाठवलं जाणार असल्याची चर्चा सुरू झाली. मात्र सध्या ह्या केवळ चर्चा सुरू असून यावर कोणतीही अधिकृतरित्या माहिती समोर आलेली नाही. Devendra Fadnvis |
हेही वाचा:





