Devendra Fadnavis : राज ठाकरेंची भूमिका निवडक ऐकण्यावर आधारित; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रत्युत्तर
Devendra Fadnavis : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी महाराष्ट्राच्या बहुभाषिक संस्कृतीबाबत केलेल्या वक्तव्यावरून मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी घेतलेल्या आक्षेपावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार पलटवार केला आहे.

Devendra Fadnavis : महाराष्ट्राची बहुभाषिक संस्कृती या विषयावर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केलेल्या वक्तव्यावरून मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी घेतलेल्या आक्षेपावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पलटवार केला आहे. राज ठाकरे यांनी निवडक ऐकण्याची आणि बोलण्याची सवय सोडून अमित शहा यांचे संपूर्ण भाषण ऐकायला हवे होते, असा टोला मुख्यमंत्र्यांनी लगावला. (Devendra Fadnavis)
अमित शहा यांनी मराठी भाषेचे ऐतिहासिक महत्त्व, तिचे वैभव आणि मातृभाषेतून प्राथमिक शिक्षणाचा आग्रह धरला होता. तसेच महाराष्ट्राच्या सर्वसमावेशक संस्कृतीचा उल्लेख केला होता, ज्याकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष करण्यात आले. (Devendra Fadnavis)
राज ठाकरे यांनी अप्रत्यक्षपणे शहा यांच्या वक्तव्यावर निशाणा साधत सोशल मीडियावर टीका केली होती. त्यावर बोलताना फडणवीस म्हणाले की, केवळ ठराविक गोष्टींवर प्रतिक्रिया देणे योग्य नाही. अनेक भाषा बोलणे म्हणजे मातृभाषा बदलणे नव्हे, असे सांगत फडणवीस म्हणाले, मी बहुभाषिक आहे, पण माझी मातृभाषा मराठी आहे. मी मराठी आहे आणि मराठीच राहीन. कोणीही माझी मराठी ओळख हिरावून घेऊ शकत नाही. (Devendra Fadnavis)
अमित शहा यांनी मराठी भाषेची केलेली स्तुती विरोधकांकडून जाणीवपूर्वक दुर्लक्षित केली जात आहे, कारण तसे न केल्यास त्यांच्याकडे टीकेसाठी मुद्दा उरणार नाही, असा आरोप मुख्यमंत्र्यांनी केला. अनेक भाषा अवगत असल्या तरी त्यामुळे प्रादेशिक अभिमानावर वा मूळ ओळखीवर कोणताही परिणाम होत नाही, असे स्पष्टीकरण फडणवीस यांनी माध्यमांशी बोलताना दिले. (Devendra Fadnavis)
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी महाराष्ट्रातील बहुभाषिक संस्कृतीचा (ज्यात मराठी, कोकणी, गुजराती, सिंधी, हिंदी, कन्नड आणि वारली भाषांचा समावेश आहे) उल्लेख केला होता. यावर प्रतिक्रिया देताना मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी एक्स (ट्विटर) वर कावळ्याच्या शामाने गाय मरत नाही, अशी अप्रत्यक्ष टीका केली होती, ज्याला आता मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिले आहे. (Devendra Fadnavis)
Devendra Fadnavis : मनोज जरांगेंनी आंदोलनाचा पुनर्विचार करावा : देवेंद्र फडणवीस
Devendra Fadnavis : मुख्यमंत्री फडणवीसांचा अचानक दिल्ली दौरा; पडद्यामागच्या राजकारणाची जोरदार चर्चा






