बैलगाडा शर्यतीवरील कोर्टाच्या निकालावर देवेंद्र फडणवीस म्हणाले ‘हा शेतकऱ्यांचा विजय..! हा महाराष्ट्राचा विजय …!’

Updated On:

नवी दिल्ली – बैलगाडा शर्यतीबाबत अखेर अंतिम निर्णय आला आहे. सुप्रीम कोर्टाने बैलगाडा शर्यतीला हिरवा कंदील दिला आहे. त्यामुळे आता बैलगाडा शर्यतीवर कोणतीही बंदी नसणार आहे. या निर्णयामुळे महाराष्ट्राला मोठा दिलासा मिळाला आहे. यावेळी तामिळनाडूतील जलीकट्टू आणि महाराष्ट्रातील बैलगाडा शर्यतीच्या निकालाचे एकत्रित वाचन करण्यात आले होते.

याआधी डिसेंबर 2021 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्रातील बैलगाडा शर्यतीवरची बंदी हटवली होती. त्यानंतर या कायद्याला आव्हान देणाऱ्या याचिका दाखल करण्यात आली होती. त्याबाबत सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाल्यानंतर दोन्ही बाजू ऐकून घेण्यात आली आहे. त्यानंतर आज सुप्रीम कोर्टाने तामिळनाडू सरकारच्या कायद्याची वैधता कायम ठेवत राज्यातील पारंपारिक जल्लीकट्टूला परवानगी असल्याचे खंडपीठाने नोंदवले.

यावर आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी बोलतांना महाराष्ट्राचा अहवाल कोर्टाने ग्राह्य धरला असं म्हणत प्रतिक्रिया दिली आहे. देवेंद्र फडणवीस म्हणाले,’मी मुख्यमंत्री असताना बैलगाडा शर्यतीसाठी कायदा तयार केला होता. त्यामुळे बैलगाडा शर्यत सुरू झाली. पंरतु, याविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली. बैल हा धावणारा प्राणी नाही, असं याचिकाकर्त्यांनी सांगितलं. त्यामुळे हा कायदा अवैध असल्याचंही ते म्हणाले. परिणामी कायद्याला स्थगिती मिळाली . हा शेतकऱ्यांचा विजय आहे हा महाराष्ट्राचा विजय आहे. असेही ते म्हणाले होते.

देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले

आणखी संबंधित बातम्या

three-language policy : तीन-भाषा धोरणावर सुप्रीम कोर्टाचा हस्तक्षेप !

2026-09-09 22:39:23

three-language policy : तीन-भाषा धोरणावर सुप्रीम कोर्टाचा हस्तक्षेप !

Nepal floods : नेपाळमध्ये पुराच्या आर्थिक परिणामांचे मूल्यांकन होणार; सात सदस्यीय संसदीय उपसमिती स्थापन

2026-09-09 19:58:21

Nepal floods : नेपाळमध्ये पुराच्या आर्थिक परिणामांचे मूल्यांकन होणार; सात सदस्यीय संसदीय उपसमिती स्थापन

Sugar Industry : सरकारचा मोठा निर्णय! 15 ऑक्टोबरपासून ऊस गाळप सुरू; साखरेचे दर कमी होणार?

2026-09-09 19:50:31

Sugar Industry : सरकारचा मोठा निर्णय! 15 ऑक्टोबरपासून ऊस गाळप सुरू; साखरेचे दर कमी होणार?

Fire News : चिंबळी फाट्यावर कंपनीला भीषण आग; साहित्य, यंत्रसामग्री जळून खाक

2026-09-09 19:25:36

Fire News : चिंबळी फाट्यावर कंपनीला भीषण आग; साहित्य, यंत्रसामग्री जळून खाक

Amruta Fadnavis: गरबामध्ये मुस्लिमांना प्रवेश न देण्याच्या मागणीवर अमृता फडणविसांनी स्पष्ट केली भूमिका; म्हणाल्या "सर्वसमावेशक उत्सव..."

2026-09-09 11:07:44

Amruta Fadnavis: गरबामध्ये मुस्लिमांना प्रवेश न देण्याच्या मागणीवर अमृता फडणविसांनी स्पष्ट केली भूमिका; म्हणाल्या "सर्वसमावेशक उत्सव..."