देवेंद्र फडणवीसच उपमुख्यमंत्री राहणार ; दिल्लीतल्या बैठकीत मोठा निर्णय

Devendra fadnavis on Vidhan Sabha । देशातील लोकसभा निवडणुकीत राज्यातील भाजपची कामगिरी खराब राहिल्याने पक्षाकडून राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच यांच्याविषयी वेगळा निर्णर घेणार असल्याच्या चर्चा सध्या रंगल्या होत्या. मात्र या सर्व चर्चांना आता पूर्णविराम देण्यात आला आहे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीसच राहणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. त्यांच्या राजीनाम्याबाबत दिल्लीमध्ये बैठकीत कोणतीही चर्चा झाली नसल्याचं समोर आलेय.
राज्यात लोकसभा निवडणुकीमध्ये महायुतीला जोरदार फटका बसला होता, ही जबाबदारी स्वीकारुन देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यंत्रीपद सोडण्याचा प्रस्ताव भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाला दिला होता. यावर आज चर्चा होईल, असा अंदाज बांधला जात होता. पण देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्याबाबत बैठकीत कोणताही चर्चा झाली नाही.
विधानसभेच्या रोडमॅपवर चर्चा Devendra fadnavis on Vidhan Sabha ।
केंद्रीय नेतृत्वासोबत या ठिकाणी बैठक पार पडली. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनीमाध्यमांशी संवात साधला. विधानसभेसाठी केंद्राकडून पूर्णपणे मदत मिळणार असल्याचे यावेळी फडणवीस यांनी सांगितलं. नुकत्याच महाराष्ट्रामध्ये झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत जो काही निकाल आला, त्याच्यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. लोकसभा निवडणुकीत कुठे आणि कशी मतं मिळाली, कुठे चांगले यश मिळालं, कुठे कमी मतं मिळाली? त्याची कारण काय काय होती? निवडणुकीत कोण कोणत्या मुद्द्यांचा इम्पॅक्ट होता, अशा सगळ्या गोष्टींची चर्चा आजच्या बैठकीत झाली. त्यासोबत येत्या विधानसभेचा रोडमॅपवर देखील एक प्राथमिक चर्चा आम्ही केली. ”
#WATCH | After the Maharashtra BJP core committee meeting, DCM Devendra Fadanvis says, “Today the Maharashtra core team had a meeting with the central leadership. We especially discussed the results seen in Maharashtra. The difference between Mahayuti and MVA is just 0.3% so we… pic.twitter.com/wm3rMsNE91
— ANI (@ANI) June 18, 2024
तसेच कुठल्याही परिस्थितीमध्ये आपल्या महायुतीच्या सर्व घटक पक्षांसोबत ही विधानसभा कशी निवडून येता येईल, या संदर्भातला एक रोड मॅप आम्ही तयार केला आहे. याबाबत आता लवकरच घटक पक्षांसोबत देखील चर्चा करणार आहोत. अत्यंत मजबुतीने आपल्याला निवडणुकीत पुढे कसे जाता येईल? या संदर्भातली सगळी कारवाई ही येत्या काळामध्ये आम्ही करणार आहोत, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.
राज्यात कोणताही नेतृत्व बदल नाही Devendra fadnavis on Vidhan Sabha ।
महाराष्ट्रातील नेतृत्वात कोणताही बदल होणार नाही, प्रदेशाध्यक्ष अथवा इतर कोणताही नेतृत्व बदल करण्यात येणार नाही. महायुती संपूर्ण ताकदीने राज्यातील विधानसभा निवडणुकीत उतरणार असल्याचं पियुष गोयल यांनी सांगितलं.





