Devendra Fadnavis on Eknath Shinde । राज्यात मागील काही दिवसांपासून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून तत्कालीन मुख्यमंत्री असणारे एकनाथ शिंदे यांच्या कामाला ब्रेक लावण्यात येत असल्याचे दिसत आहे. त्यातच आता आणखी एका निर्णयाला फडणवीसांकडून स्थगिती देण्यात आली आहे. एवढेच नाही तर शिंदेंच्या नेत्यावर गंभीर स्वरूपाचे आरोप देखील करण्यात आले आहेत. राज्य सरकारकडून तत्कालीन शिंदे सरकारच्या काळातील आरोग्य विभागाच्या 3 हजार 200 कोटी रुपयांच्या कामांना स्थगिती देण्यात आली आहे. तसेच कामाचा कोणताही अनुभव नसताना कंपनीला यांत्रिकी साफसफाईचे कंत्राट दिल्याचा ठपका तत्कालीन आरोग्य मंत्री तानाजी सावंतांवर ठेवण्यात आला आहे. कामाचा कोणताही अनुभव नसताना कंपनीला कंत्राट Devendra Fadnavis on Eknath Shinde । शिंदे सरकारच्या कार्यकाळात तानाजी सावंत हे आरोग्य मंत्री होते. त्यांच्या काळात अधिकाऱ्यांच्या बदल्या, अँब्युलन्स खरेदीसह हजारो कोटी रुपयांचे घोटाळे झाल्याचा आरोप करण्यात येत आहे. आरोग्य विभागाच्या अखत्यारीतील सर्व शासकीय रुग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि उपकेंद्रे येथे बाह्य यंत्रणेद्वारे सफाई करण्याचा करार करण्यात आला होता. यासाठी वार्षिक 638 कोटी रुपये तर 3 वर्षांसाठी एकूण 3, हजार 190 कोटी रुपयांचा ठेका पुण्यातील एका खासगी कंपनीला 30 ऑगस्ट 2024 रोजी देण्यात आला होता. दरम्यान, आरोग्य विभागातील एकनाथ शिंदेंच्या याच निर्णयाला देवेंद्र फडणवीसांनी स्थगिती दिली आहे. फडणवीसांच्या निर्णयाचे स्वागतच- संजय राऊत Devendra Fadnavis on Eknath Shinde । दरम्यान , मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेल्या निर्णयाचे स्वागत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) पक्षाकडून करण्यात येत असल्याचे दिसत आहे. याविषयी बोलताना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी,”एकनाथ शिंदे यांच्या काळात जी कामे झाली ती काम झालीच नाही झाला तो केवळ भ्रष्टाचारच. शिंदेंच्या काळात आरोग्य मंत्री कोण होतं हे साऱ्यांना माहिती आहे आणि त्यांच्या अल्प कार्यकाळात किती घोटाळे झाले हेही सर्वांना ठाऊक आहेत. म्हणूनच भाजपकडून अशा भ्रष्ट मंत्र्यांना विरोध होता त्यातील ते एक आहेत. सार्वजनिक आरोग्य खात्याचा थेट जनतेशी संपर्क येतो. मात्र त्या खात्यात भ्रष्टाचार होणार असेल तर ते कसलं खातं आणि कसलं राजकारण. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सर्व थांबवत आहेत आणि पुढे ही थांबवणार असतील तर आणि आधीचा भ्रष्टाचार कसा झाला हे जर जनतेसमोर आणणार असतील तर नक्की आम्ही त्यांचं स्वागत करू. त्यांच्या प्रत्येक कृतीचा आम्ही स्वागतच करू. असे म्हणत देवेंद्र फडणवीस यांचे कौतुक केले आहे.