Maharashtra Politics : शरद पवारांचा पक्ष फुटणार? NDA प्रवेशाच्या चर्चांवर देवेंद्र फडणवीसांनी स्पष्टचं सांगितलं
Maharashtra Politics : महाराष्ट्राच्या राजकारणात राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्ष एनडीएमध्ये सहभागी होणार किंवा बाहेरून पाठिंबा देणार, अशा चर्चांना गेल्या काही दिवसांपासून उधाण आले आहे.

Maharashtra Politics : महाराष्ट्राच्या राजकारणात राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्ष एनडीएमध्ये सहभागी होणार किंवा बाहेरून पाठिंबा देणार, अशा चर्चांना गेल्या काही दिवसांपासून उधाण आले आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या सर्व चर्चांवर स्पष्ट भूमिका मांडत अफवांना पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला आहे. (Maharashtra Politics)
दिल्ली दौऱ्यावर असताना माध्यमांशी बोलताना फडणवीस म्हणाले की, “शरद पवार यांचा पक्ष एनडीएसोबत येणार नाही. ही पूर्णपणे पेरलेली बातमी असून त्यात कोणतेही तथ्य नाही.” (Maharashtra Politics)
“एनडीएमध्ये कोणताही नवा पक्ष येणार नाही”
मुख्यमंत्री फडणवीस यांनी पुढे सांगितले की, “महाराष्ट्रातून एनडीएमध्ये कोणताही नवा पक्ष सहभागी होणार नाही. आम्ही आमच्यासोबत कोणालाही जोडण्याचा प्रयत्न करत नाही.” त्यामुळे शरद पवार यांच्या पक्षाच्या संभाव्य एनडीए प्रवेशाबाबत सुरू असलेल्या चर्चांना त्यांनी स्पष्ट शब्दांत नकार दिला. (Maharashtra Politics)
“आमदार-खासदार फोडणार नाही”
राजकीय पक्षफोडीच्या चर्चांवरही फडणवीस यांनी भूमिका स्पष्ट केली. “शरद पवार यांच्या पक्षातील आमदार किंवा खासदारांना आम्ही भविष्यात फोडणार नाही,” असेही त्यांनी ठामपणे सांगितले. (Maharashtra Politics)
रोहित पवारांचाही NDA ला नकार
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार यांनीही एनडीएला पाठिंबा देण्याच्या चर्चांना फेटाळले आहे. “आम्ही एनडीएला कोणताही पाठिंबा देणार नाही,” असे त्यांनी स्पष्ट केले. (Maharashtra Politics)
गेल्या काही दिवसांपासून शरद पवारांचा पक्ष एनडीएमध्ये सहभागी होणार किंवा सरकारला बाहेरून पाठिंबा देणार असल्याच्या विविध चर्चा सुरू होत्या. मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आमदार रोहित पवार या दोघांच्या स्पष्ट भूमिकेनंतर या चर्चांवर सध्या तरी पडदा पडल्याचे मानले जात आहे. (Maharashtra Politics)






