Devendra Fadnavis : “मंगेशकर कुटुंबातील दुसरा तारा हरपला”; आशाताईंच्या निधनावर मुख्यमंत्री फडणविसांकडून दु:ख व्यक्त
Devendra Fadnavis :

Devendra Fadnavis : ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांनी 92 व्या वर्षी जगाचा निरोप घेतला. आशा भोसले यांच्या छातीत संसर्ग झाल्याने त्यांना शनिवारी रात्री उशिरा ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. आज आशा भोसले यांचे पुत्र आनंद भोसले यांनी आशा भोसले यांच्या निधनाची माहिती दिली. त्यांच्या जाण्याने हिंदी चित्रपटसृष्टी, गायन क्षेत्र आणि कला क्षेत्रावर शोककळा पसरली आहे.
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील आपल्या भावना व्यक्त केल्या आहे. “मंगेशकर कुटुंबातील दुसऱ्या तारा आशा भोसले यांचं निधन झालं आहे. अखेरच्या श्वासापर्यंत त्यांनी संगीताची सेवा केली. गायिका म्हणून जर कोणाकडे पाहायचं असेल तर, त्या आशा ताई होत्या. अखेरच्या श्वासापर्यंत त्यांनी संगीताची सेवा केली.”
पुढे ते म्हणाले, “92 व्या वर्षी देखील त्यांचा उत्साह वाखण्याजोगा होता. ईश्वरी आवाज आपल्यातून निघून गेला आहे. आशाताईंचं व्यक्तीमत्व जिंदादिल होतं. आशाताईंची 100 वी करण्याची संधी काळाने दिली. संगीताकरीता आजचा दिवस खूप दु:खद आहे. आशाताईंना मी भावपूर्ण श्रंध्दाजली अपर्ण करतो. त्यांच्या कुटुंबाच्या दु:खामध्ये आम्ही सहभागी आहोत.
वयाच्या नव्वदीमध्ये तीन तास कॉन्सर्ट करणाऱ्या त्या जगातील एकमेव गायिका आहेत. त्यांनी शास्त्रीय, पॉप अशा सर्व प्रकारचे संगीत आणि 20हून अधिक भाषांमध्ये गाणी गायल्याचे,” देखील फडणविसांनी यावेळी सांगितले.
हेही वाचा:






