नाशिकमधील ऑक्सिजन गळतीच्या घटनेनंतर देवेंद्र फडणवीस आक्रमक; म्हणाले…
Updated On:

मुंबई – नाशिक येथील डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयात ऑक्सिजन टाकीला गळती लागल्याच्या घटनेने राज्यात एकच खळबळ उडाली आहे. या धक्कादायक घटनेत आता 22 रुग्णांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. या घटनेंतर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आक्रमक झाले आहेत.
नाशिकमधील रुग्णालयात घडलेली ऑक्सिजनची गळतीची दुर्घटना अत्यंत दुर्दैवी आहे. या घटनेची सखोल चौकशी व्हावी. तसेच अशा प्रकारची घटना पुन्हा होऊ नये यासाठी संपूर्ण राज्यात खबरदारी घेण्यात यावी, असं विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. नाशिक महानगरपालिकेच्या झाकीर हुसेन रुग्णालयात आज दुपारी ऑक्सिजन टाकीच्या वॉलमधून लिकेज झाल्यामुळे प्रेशर कमी झाले. त्यामुळं 22 पेशंट मृत्यूमुखी पडले. तर अनेक करोना रुग्णांना इतरत्र हलवण्यात आले.





