Devendra Fadanvis : त्यांनी माफी मागितली पाहिजे; देवेंद्र फडणवीस यांची हर्षवर्धन सपकाळ यांच्यावर टीका
छत्रपती शिवाजी महाराज आणि टिपू सुलतान यांच्यातील काम समकक्ष आहे असे विधान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी संताप व्यक्त केला आहे.

Devendra Fadanvis : छत्रपती शिवाजी महाराज आणि टिपू सुलतान यांच्यातील काम समकक्ष आहे असे विधान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी संताप व्यक्त केला आहे.
हजारो, लाखो हिंदूंची हत्या करणाऱ्या टिपू सुलतानची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांशी करुन दोघांना सारखा सन्मान द्या म्हणणं यापेक्षा जास्त लांगुलचालन, जोडे चाटणे या जन्मात पाहिलेले नाही अशा शब्दांत त्यांनी टीका केली आहे. नागपुरात ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) म्हणाले, त्यांना लाज वाटली पाहिजे. टिपू सुलतान यांची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांशी करण्याचे जे काम त्यांनी केले आहे ते अतिशय निंदनीय आहे.
शिवरायांनी स्वराज्य तयार केले. मोघलांच्या जोखडातून सामान्य माणसाला मुक्त केले. सामान्य जनतेचे राज्य तयार करणारे शिवराय होते. त्याचवेळी हजारो, लाखो हिंदूंची हत्या करणाऱ्या टिपू सुलतानची तुलना करुन दोघांना सारखा सन्मान द्या म्हणणे यापेक्षा जास्त लांगुलचालन, जोडे चाटणे या जन्मात पाहिलेले नाही.
आम्ही हे अजितबात सहन करणार नाही.
टिपू सुलतान आणि शिवरायांची तुलना केली याबद्दल त्यांनी माफी मागितली पाहिजे अशी मागणीही त्यांनी केली आहे. काँग्रेस पक्षात थोडीशीही नैतिकता उरली असेल तर काँग्रेस पक्षानेही याची दखल घेतली पाहिजे. त्यांच्या मित्रपक्षांनीही त्यावर आपली काय भूमिका आहे हे मांडले पाहिजे. हे कोणत्या शाळेत इतिहास शिकले त्याचेही संशोधन झाले पाहिजे. नवा इतिहास जो लिहिला जात आहे तो महाराष्ट्र, भारत खपवून घेणार नाही, असा इशाराच त्यांनी दिला.






