Ashok Chavan | माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काँग्रेसमधील काळात दोन वेळा मुख्यमंत्रीपदी काम केले आहे. त्यावेळी त्यांनी भाजपवर टीकेची झोड उठवली होती. मात्र आता त्याच भाजपचे अशोक चव्हाण कमळ हाती घेतले आहे. अशोक चव्हाण यांनी वर्ष भरपूर्वीच भाजप मध्ये प्रवेश केला आणि ते राज्यसभेवर खासदार झाले. परंतु एकेकाळी भाजपवर निशाणा साधणारे चव्हाण पंतप्रधान नरेंद्र मोदींचे कौतुक करताना दिसत आहे. नांदेडमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी काँग्रेस सरकार आणि भाजप सरकारच्या काळातील विकास कामांची गती यावर भाष्य केले आहे. अशोक चव्हाण काय म्हणाले ? “काँगेसच्या काळात विकास झाला, मात्र त्यापेक्षा दुपटीने मागच्या अकरा वर्षात देशाचा विकास झाला. मी काँगेस मध्येच होतो. काँगेसच्या काळात ही विकास झाला मात्र जो विकास मागच्या 11 वर्षात झाला तो अधिक गतीने झाला. आज जमाना आयपीएलचा आहे. त्यामुळे कमी वेळेत लक्ष्य गाठणं महत्त्वाचं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विकसित भारत 2047 पर्यंत करण्याचं धोरण ठेवले आहे,” असे अशोक चव्हाण म्हणाले. दरम्यान, काँग्रेसच्या कार्यकाळात भाजपकडून भ्रष्टाचाराचा आरोप होतं होता, त्यावर प्रतिक्रिया देण्याचं चव्हाण यांनी मात्र टाळलं. वंदे भारत एक्स्प्रेस नांदेड पर्यंत वाढण्याचा निर्णयाचे श्रेय तत्कालीन रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांना आहे रावसाहेब दानवे यांनी यासाठी पाठपुरावा केला. जालना ते नांदेड पर्यंत रेल्वे लाईनचे काम सुरु होते. त्यामुळे तो निर्णय आता झाला. आता कोण श्रेय घेते मला माहीत नाही. रावसाहेब दानवे यांनी 2023 सालीच ही घोषणा केली होती, असेही अशोक चव्हाण म्हणाले. Ashok Chavan | हेही वाचा: विश्वास आणि आत्मविश्वास यशस्वी वकिलीचा मूलमंत्र – न्यायमूर्ती मिलिंद जाधव