Devdas and Tere Naam Returning to Big Screens: शाहरूख – सलमानच्या चाहत्यांसाठी खुशखबर! ‘तेरे नाम’ आणि ‘देवदास’ पुन्हा मोठ्या पडद्यावर
Devdas and Tere Naam Returning to Big Screens: बॉलिवूडचे दोन मोठे सुपरस्टार शाहरूख खान आणि सलमान खान यांच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलेले त्यांचे गाजलेले चित्रपट ‘तेरे नाम’ आणि ‘देवदास’ पुन्हा एकदा सिनेमागृहात री-रिलीज होणार आहेत.

Devdas and Tere Naam Returning to Big Screens: बॉलिवूडचे दोन मोठे सुपरस्टार शाहरूख खान आणि सलमान खान यांच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे.
प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलेले त्यांचे गाजलेले चित्रपट ‘तेरे नाम’ (Tere Naam ) आणि ‘देवदास’ (Devdas ) पुन्हा एकदा सिनेमागृहात री-रिलीज होणार आहेत. त्यामुळे जुन्या आठवणी ताज्या करत हे सिनेमे मोठ्या पडद्यावर पाहण्याची संधी पुन्हा मिळणार आहे.
Tere Naam
सलमान खानचा ‘तेरे नाम’ हा चित्रपट 2003 साली प्रदर्शित झाला होता. सतीश कौशिक दिग्दर्शित या चित्रपटात सलमान खान आणि भूमिका चावला मुख्य भूमिकेत होते. राधेची भावनिक कथा आजही प्रेक्षकांच्या डोळ्यांत पाणी आणते. हा चित्रपट 27 फेब्रुवारी 2026 रोजी PVR आणि INOX थिएटर्समध्ये पुन्हा प्रदर्शित होणार आहे. बराच काळ चाहत्यांकडून या चित्रपटाच्या री-रिलीजची मागणी होत होती.
तर दुसरीकडे, संजय लीला भन्साळी दिग्दर्शित ‘देवदास’ हा चित्रपट 2002 साली प्रदर्शित झाला होता. शाहरूख खान आणि ऐश्वर्या राय बच्चन यांच्या अभिनयाने हा सिनेमा अजरामर ठरला. जवळपास 24 वर्षांनंतरही या चित्रपटाची जादू कायम आहे. ‘देवदास’ 6 फेब्रुवारी 2026 रोजी पुन्हा एकदा सिनेमागृहात प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

Devdas
इतकंच नाही तर मणिरत्नम दिग्दर्शित ‘युवा’ हा चित्रपटसुद्धा 20 फेब्रुवारी 2026 रोजी पुन्हा थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.
एकूणच, फेब्रुवारी महिना बॉलिवूडप्रेमींसाठी खास ठरणार असून, जुन्या क्लासिक सिनेमांचा अनुभव मोठ्या पडद्यावर घेण्याची सुवर्णसंधी मिळणार आहे.





