2002 मध्ये संजय लीला भन्साळी दिग्दर्शितहा चित्रपट प्रदर्शित झाला होता. अशात नुकतेच या चित्रपटाबद्दल शाहरुख खानने मोठा खुलासा केला आहे.
तो म्हणाला,’देवदाससारख्या ‘दारुड्या’च्या भूमिकेत आपली प्रतिमा प्रेक्षकांना आवडणार नाही, असे मला वाटले. पण चित्रपट निर्माते संजय लीला भन्साळी यांनी मला समजवले ते म्हणाले,’जर तू या पात्रासाठी हो म्हटले तरच मी चित्रपट बनवणार नाही.’ असेही त्याने सांगितले.
स्वित्झर्लंडमधील लोकार्नो फिल्म फेस्टिव्हलमध्ये प्रश्नोत्तराच्या सत्रात भन्साळींच्या शब्दांची आठवण करून देताना खानने पुढे सांगितले, ‘तू या चित्रपटात नसणार तर मी हा चित्रपट करणार नाही, कारण तुमचे डोळे देवदाससारखे आहेत आणि या पात्रासाठी मी फक्त तुझा विचार करतोय.’ यानंतर मी होकार दिला.’
‘देवदास’, भारतीय साहित्य आणि चित्रपटसृष्टीतील सर्वात लोकप्रिय कथांपैकी एक, शरतचंद्र चट्टोपाध्याय यांच्या 1917 च्या कादंबरीवर आधारित आहे. त्यावर आधारित चित्रपट 1936 मध्ये हिंदी चित्रपटसृष्टीत पहिल्यांदा बनवण्यात आला होता, ज्यामध्ये केएल सहगल मुख्य भूमिकेत होते, तर 1955 मध्ये बनलेल्या चित्रपटात दिलीप कुमार यांनी ही व्यक्तिरेखा साकारली होती.
चित्रपटाबाबत सांगायचे झाल्यास, 2002 मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटात ऐश्वर्या राय बच्चनने पारोची भूमिका केली होती, माधुरी दीक्षित नेनेने चंद्रमुखीची भूमिका केली होती. जॅकी श्रॉफने चुन्नी बाबूची भूमिका केली होती.