अहमदनगर । उपमुख्यमंत्री पवार साधणार महिलांशी संवाद

पारनेर – राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या आढावा घेण्यासाठी व महिलांसोबत संवाद साधण्यासाठी सोमवार दि. 22 रोजी पारनेर येथे लक्ष्मीनारायण कार्यालय येथे येणार आहे. ते तालुक्यातील महिलांची संवाद साधणार असल्याची माहिती जिल्हा बँकेचे संचालक प्रशांत गायकवाड, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष विक्रमसिंह कळमकर, युवकचे तालुकाध्यक्ष भास्कर उचाळे, महिला आघाडीच्या तालुकाध्यक्षा यांनी पत्रकार परिषदेत दिली.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा दि. 22 रोजी वाढदिवस असून त्या वाढदिवसानिमित्त पारनेर येथे तालुक्यातील महिलांना मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत येणाऱ्या अडचणी व समस्याविषयी जाणून घेणार आहेत. त्या समस्या सोडवण्यासाठी थेट उपमुख्यमंत्री पवार हे पारनेर येथे येऊन अधिकारी यांना तशा सूचना करणार आहोत. याबाबतची माहिती प्रशांत गायकवाड व विक्रमसिंह कळमकर यांनी दिली आहे.
महाराष्ट्र सरकारकडून ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने’ची घोषणा करण्यात आली. या योजनेंतर्गत महिलांना दरमाहा दीड हजार रुपये मिळणार आहेत. योजनेची घोषणा झाल्यापासूनच अर्ज करण्यासाठी महिलांची झुंबड उडाल्याचे पाहायला मिळाले होते. सुरुवातीला अर्ज करताना महिलांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. या योजनेचे पैसे खात्यात कधी जमा होणार? याकडे सर्व महिलांचे लक्ष लागलं आहे. या संदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार महिलांना मार्गदर्शन करणार आहेत. महसूल, अर्, सहकार या क्षेत्रातील प्रशासकीय अधिकारी देखील येथे उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे तालुक्यातील जास्तीत-जास्त महिलांनी पारनेर येथे अजित पवार यांच्या उपस्थित होणाऱ्या महिला संवाद कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाह तालुकाध्यक्ष विक्रम कळमकर यांनी केले आहे.





